लोकपालचं काय होणार?

लोकपलाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलय. या बैठकीपूर्वी रात्री युपीच्या घटक पक्षांशी बैठक पार पडली. या बैठकीत लोकपालबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.

Updated: Dec 14, 2011, 06:00 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

लोकपालच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलय. या बैठकीपूर्वी रात्री युपीच्या घटक पक्षांशी बैठक पार पडली. या बैठकीत लोकपालबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. अण्णांनी 11 डिसेंबरला जंतर मंतरवर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन सरकारला झलक दाखवलीय.

 

तसंच अण्णांच्या स्टेजवर जाऊन भाजप, सीपीएम, सीपीआय, जेडियू यासारख्या विरोधी पक्षांनी अण्णांना पाठिंबा दर्शवल्यानं लोकपालवर सर्वसहमती घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसंच पंतप्रधानांना लोकपालच्या कक्षेत आणण्याचा निर्णयही आज घेतला जाण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, अण्णांच्या जनलोकपालच्या आंदोलनाला मायावतींनी पाठिंबा जाहीर केलाय. पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत यावेत अशी मागणीही मायावतींनी केलीये. अण्णांना पाठिंबा देतानाच मायावतींनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काँग्रेसवर टीकास्त्र सोडलयं. काँग्रेस भ्रष्टाचाराच्या मुद्यावर गंभीर नसल्याचं मायावती म्हणाल्यात.