अर्धवट राहिलेली सीरिज भारतानं २-१नं जिंकली!

विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतानं शुक्रवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचा ५९ धावांनी पराभव करीत मालिका २-१ नं जिंकली. पाहुण्या संघानं मालिकेतून माघार घेतल्यामुळं पाचवा सामना आता रद्द झाला आहे.

Updated: Oct 18, 2014, 07:52 AM IST
अर्धवट राहिलेली सीरिज भारतानं २-१नं जिंकली! title=

धर्मशाला : विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतानं शुक्रवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचा ५९ धावांनी पराभव करीत मालिका २-१ नं जिंकली. पाहुण्या संघानं मालिकेतून माघार घेतल्यामुळं पाचवा सामना आता रद्द झाला आहे.

भारताकडून कोहली (१२७), सुरेश रैना (७१) आणि अजिंक्य रहाणे (६८) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर ६ बाद ३३० धावांची मजल मारली आणि प्रतिस्पर्धी वेस्ट इंडीजचा डाव ४८.१ षटकांत २७१ धावांत गुंडाळला. 

भारतातर्फे भुवनेश्वर आणि अक्षर यांनी प्रत्येकी १० षटकांत अनुक्रमे २५ व २६ धावांच्या मोबदल्यात २-२ बळी घेतले. विंडीजतर्फे सॅम्युअल्सने १०६ चेंडूंना सामोरे जाताना ११२ धावा फटकाविल्या. त्यात ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.