संघर्ष

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटणार?

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोर जावं लागलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधला संघर्ष अजून संपलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आघाडी बाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं सांगत आघाडी राहीलच अशी शक्यता नसल्याचे संकेत दिलेत.

May 25, 2014, 09:30 PM IST

अमरावतीत राष्ट्रवादीत संघर्ष, पक्ष सोडण्याची धमकी

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा संघर्ष इरेला पेटला आहे. अमरावतीची उमेदवारी आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना दिली जाणार असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीतले निष्ठावान कार्यकर्ते पक्ष निरीक्षकांवरच भडकले. राणांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यास पक्ष सोडून देण्याची धमकी सरचिटणीस संजय खोडके यांनी दिलीय.

Feb 8, 2014, 09:04 PM IST

`मनसे`त अंतर्गत धुसफूस? राज यांचा आदेश मानणार कोण?

पुण्यात एलबीटीच्या निमित्तानं मनसेत पेशवाईची नांदी पहायला मिळतेय. राज ठाकरेंनी जनतेला वेठीला धरु नका, असा इशारा व्यापा-यांना दिल्यानंतरही, मनसेचे सरचिटणीस आणि पुण्याचे प्रभारी अनिल शिदोरे यांनी व्यापा-यांविरोधात आंदोलन करु नये असा फतवा काढलाय.

May 19, 2013, 04:28 PM IST