वसंत मोरेंचं ठरलं! राज ठाकरेंनंतर वंचितचीही साथही सोडणार; ठाकरे गटात करणार प्रवेश

Vasant More to Join Thackeray Faction: लोकसभा निवडणुकीनंतर वसंत मोरे आता वंचितची साथही सोडणार आहेत. वसंत मोरे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 9 जुलैला आपण ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती वसंत मोरेंनी दिली आहे.     

शिवराज यादव | Updated: Jul 4, 2024, 02:22 PM IST
वसंत मोरेंचं ठरलं! राज ठाकरेंनंतर वंचितचीही साथही सोडणार; ठाकरे गटात करणार प्रवेश title=

Vasant More to Join Thackeray Faction: लोकसभा निवडणुकीनंतर वसंत मोरे आता वंचितची साथही सोडणार आहेत. वसंत मोरे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 9 जुलैला आपण ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती वसंत मोरेंनी दिली आहे. वसंत मोरेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर आता स्वत: वसंत मोरे यांनीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपण ठाकरे गटात प्रवेश कऱणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. संजय राऊत यांनी याआधी पुण्यात त्यांचं राजकीय, सामाजिक कार्य चांगलं आहे. लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील असं सांगितलं होतं. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळेसही वसंत मोरे आपल्याला ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती. मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा मोठा पराभव झाला होता. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. वसंत मोरे यांना खडकवासला किंवा हडपसर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 

9 जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार - वसंत मोरे

उद्धव ठाकरेंची भेट घेतली असता त्यांनी 9 तारीख दिली आहे. 9 तारखेला मातोश्रीवर माझ्या समर्थकांसह पक्षप्रवेश पार पडणार आहे अशी माहिती वसंत मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. विधानसभा निवडणूक लढण्यासंबंधीचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील असंही त्यांनी सांगितलं. 

वंचित सोडण्यामागील कारण विचारलं असता वसंत मोरे म्हणाले की, "मी वंचितमध्ये गेलो होतो. मला मतदारांनी स्विकारलं नाही, यामुळे मी बाळासाहेबांसोबत बोललो होतो. पुण्यात मतांचा टक्का हवा तितका नव्हता. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करत आहे". 
 
"माझी सुरुवात शिवसेनेतून झाली आहे. मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो. मी 2006 पर्यंत कॅटनमेंट विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा उपविभाग अध्यक्षही होतो. त्यामुळे परतीचा प्रवास पुन्हा शिवसेनेकडे झाला आहे," असं वसंत मोरे यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, "पुणे महापालिकेत हे सगळे माझे सहकारी आहेत. त्यामुळे पुणे महापालिका आणि विधानसभ निवडणुकीत पुणे शहरात ठाकरे गटाकडून कडवं आव्हान उभं करु असा निर्धार त्यांनी व्यक्त केला".