संसद

...जेव्हा नेहरु-गांधी घराण्याची पाचवी पिढी संसदेत झाली दाखल

नेहरु-गांधी घराण्याची पाचवी पिढी बुधवारी संसदेत पाहायला मिळाली.

Jul 17, 2014, 11:44 AM IST

व्हिडिओ: पाहा काँग्रेसचे युवराज लोकसभेत झोपले

लोकसभेत चर्चेदरम्यान खासदारांना झोप अनावर झाल्याचं चित्र आपण अनेकवेळा पाहिलं असेल... पण आज लोकसभेत चक्क राहुल गांधी झोपले.... 

Jul 9, 2014, 05:58 PM IST

पाच हजार करोड रुपयांना कुणीही नाही वाली!

देशातील वेगवेगळ्या बँकांत जवळपास पाच हजार करोड रुपये धूळ खात पडलेत... या पैशांचा कुणीही वाली नाही. ही माहिती मंगळवारी संसदेत दिली गेली. 

Jul 9, 2014, 07:59 AM IST

महागाईच्या मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

 महागाई आणि रेल्वे भाडेवाढीविरोधात विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरत गोंधळ घातल्यानं लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करावं लागलंय. महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत होते. 

Jul 7, 2014, 05:38 PM IST

संसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

१६व्या लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या सेशनमध्ये रेल्वे बजेट आणि अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी वाढती महागाईवरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.  

Jul 7, 2014, 09:09 AM IST

राहुल गांधींमध्ये शासनकर्त्याचे गुण नाहीत- दिग्विजय सिंह

 राहुल गांधी यांनी पराभवानंतर काँग्रेसचं लोकसभेत नेतृत्व करायला हवं होतं, राहुल गांधी यांची सत्ता गाजवण्याची प्रवृत्ती नाही, त्याऐवजी राहुल गांधी यांना अन्यायाविरोधात लढायला आवडतं, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.

Jun 29, 2014, 01:16 PM IST

खासदारांना मोदींच्या खास सूचना, पाया पडू नका!

संसदेत येताना खासदारांनी चांगला अभ्यास करुन येणे. त्यांची नियमीत उपस्थित असवी तसेच त्यांनी कोणाच्याही पाया पडू नका आणि माझ्या पाया पडू नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत.

Jun 6, 2014, 07:23 PM IST

संसदेत मोदींसहीत इतर खासदारांचा शपथग्रहण सोहळा

सोळाव्या लोकसभेत आज प्रोटेम स्पीकर कमलनाथ यांनी आज लोकसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांच्या शपथग्रहण सोहळ्याला सुरु केली. सर्वात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारकीची शपथ घेतली.

Jun 5, 2014, 11:45 AM IST

पहिल्याच दिवशी लोकसभा अधिवेशन स्थगित

सोळाव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. परंतु, आज सभागृहात कोणतंही कामकाज होणार नाही.

Jun 4, 2014, 10:13 AM IST

पंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. याला प्रस्तावाला अनुमोदन मुलरलीमनोहर जोशी, माजी अध्यक्ष नितीन गडकरी, सुषमा स्वराय यांनी दिले.

May 20, 2014, 12:15 PM IST

बीएसएफ जवानाचा संसदेसमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न

शुक्रवारी दुपारी दिल्ली संसद भवनाच्या बाहेर एका व्यक्तीनं स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करू पाहणारा ही व्यक्ती एक `बॉर्डर सिक्युरिटी फोर्स` बीएसएफ जवान असल्याचं सांगितलं जातंय.

Feb 21, 2014, 04:24 PM IST

'चिल्लर पार्टी' नव्हे ही तर 'थिल्लर पार्टी'!

`लोकशाही` या शब्दाला लाजवेल अशा घटना सध्या संसदेत आणि विधानसभेसारख्या ठिकाणी घडताना दिसत आहेत. नुकतंच लोकसभेत खासदारांनी `मिरची स्प्रे कांड` घडवून आणलं होतं... त्यानंतर आज पुन्हा एकदा `उघडबंब` नेत्यांनी संसदीय परंपरा धुळीला मिळवल्याचं दिसून आलं.

Feb 19, 2014, 03:47 PM IST

`असीमानंदांच्या स्फोटा`चे आज संसदेत पडसाद?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा देशातील विविध बॉम्बस्फोटांना `आशिर्वाद` होता, असा खळबळजनक दावा या स्फोटांतील आरोपी स्वामी असीमानंद यांनी केलाय.

Feb 7, 2014, 09:52 AM IST

राज्यसभेत लोकपालवर मतदान? शिवसेनेचा विरोध

संसदेच्या या अधिवेशनातच लोकपाल विधेयक संमत करावं, त्यासाठी गरज पडल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा लागला तरी वाढवावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषद घेतली.

Dec 15, 2013, 08:29 PM IST