राहुल गांधींमध्ये शासनकर्त्याचे गुण नाहीत- दिग्विजय सिंह

 राहुल गांधी यांनी पराभवानंतर काँग्रेसचं लोकसभेत नेतृत्व करायला हवं होतं, राहुल गांधी यांची सत्ता गाजवण्याची प्रवृत्ती नाही, त्याऐवजी राहुल गांधी यांना अन्यायाविरोधात लढायला आवडतं, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.

PTI | Updated: Jun 29, 2014, 01:16 PM IST
राहुल गांधींमध्ये शासनकर्त्याचे गुण नाहीत- दिग्विजय सिंह title=

नवी दिल्ली:  राहुल गांधी यांनी पराभवानंतर काँग्रेसचं लोकसभेत नेतृत्व करायला हवं होतं, राहुल गांधी यांची सत्ता गाजवण्याची प्रवृत्ती नाही, त्याऐवजी राहुल गांधी यांना अन्यायाविरोधात लढायला आवडतं, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.

पराभवानंतर संकटात सापडलेल्या काँग्रेसचं लोकसभेत नेतृत्व राहुल गांधी यांनी स्वीकारलं नाही. त्यामुळं काँग्रेसमध्ये अनेक जण नाराज आहेत. त्याचाच हा एक भाग असल्याचं म्हटलं जातंय. 

राहुल गांधी यांनी जबाबदारी न स्वीकारता मागच्या बाकावर बसणे पसंत केलंय. ही जबाबदारी त्यांनी दुसऱ्या नेत्यांकडे सोपविली आहे, असं का? या प्रश्नावर दिग्विजयसिंग यांनी प्रथमच जाहीरपणे टीका करीत नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यांनी लोकसभेत पक्षनेतेपद का स्वीकारले नाही, असा प्रश्न खोदून विचारण्यात आला असता ते म्हणाले, लोकशाहीत विरोध हा आवश्यक असतो. काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळं उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ही जबाबदारी स्वीकारायला हवी होती.

गोव्यात टीका, बंगळुरुमध्ये खुलासा

दिग्विजयसिंग यांच्या विधानानंतर खळबळ उडाली असताना त्यांनी नंतर बंगळुरुमध्ये खुलासा केला. राहुल गांधी हे नेहमीच अन्यायाविरुद्ध लढत आले आहे. सत्ता मिळविण्यासाठी त्यांचा खटाटोप नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.