स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणजे काय

ब्लॉग : स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणजे काय

आपल्याला होणाऱ्या रोगांचे किंवा व्याधींचे प्रकार मागील शतकापेक्षा खूप प्रमाणात बदलले आहेत. संसर्गजन्य रोगांवर आपण जवळ जवळ मात केली आहे. पण या रोगांची जागा आता नव्या रोगांनी घेतली आहे. जसे की आपल्या नव्या अशा विशिष्ट रहाणीमानामुळे, आहारातील बदलांमुळे अथवा आजच्या धकाधकीच्या जीवनात उद्भवणाऱ्या विलक्षण ताण तणावामुळे, रक्तदाब, मधुमेह इत्यादींनी घेतली आहे. या सर्व स्थित्यंतरांबरोबर वैद्यकीय शास्त्रात वाखाणण्याजोगी उत्क्रांती होत गेली आणि माणसाचा एकूण जीवन काळ वाढला. अर्थात या चांगल्या गोष्टीची दुसरी बाजू मात्र तितकीशी चांगली नाही. जागतिक पातळीवर वृध्दांचे वाढलेले आयुष्यमान, त्यांची वाढणारी संख्या त्यामुळे लोकसंख्येवर पडणारा ताण आणि वृध्दत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी यांना आजचा समाज सामोरा जात आहे.

Aug 18, 2017, 05:02 PM IST