स्वच्छ भारत अभियान

नरेंद्र मोदींनी केले शरद पवारांचे कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे नाते आता हळूहळू खुलायला लागले आहे. याचा प्रत्यय आज आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भारत स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याबद्दल त्यांची स्तुती केली आहे. 

Nov 14, 2014, 07:11 PM IST

स्वच्छ भारत अभियानासाठी शाहरुखचा नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाला सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अभिनेता शाहरुख खान यानं मोदींच्या या अभियानासाठी हातात झाडू घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र मोदींच्या या अभियानाला पाठिंबा दर्शवत जनतेमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचत असल्याचं शाहरुखनं म्हटलंय. 

Nov 13, 2014, 03:25 PM IST

मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात आता नेहरू, गांधींचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हरियाणातील हिस्सारला सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी बोलतांना मोदींनी स्वच्छ भारत अभियान पुढं नेत येत्या १४ नोव्हेंबरपासून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन केलंय. चाचा नेहरूंच्या जयंतीपासून १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत हे अभियान राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे, स्वच्छतेबद्दल जागरूक करावं, असं मोदी म्हणाले. 

Oct 6, 2014, 03:37 PM IST

‘स्वच्छ भारत’साठी क्रिकेटच्या देवानं हाती घेतला झाडू!

 स्वच्छता अभियानामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर स्वतः सक्रीय झालाय. आज पहाटे 4:30 वाजता त्यानं आपल्या मित्रांसह हातात झाडू घेऊन साफसफाई केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. 

Oct 6, 2014, 08:24 AM IST