हिस्सार, हरियाणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हरियाणातील हिस्सारला सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी बोलतांना मोदींनी स्वच्छ भारत अभियान पुढं नेत येत्या १४ नोव्हेंबरपासून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन केलंय. चाचा नेहरूंच्या जयंतीपासून १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत हे अभियान राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे, स्वच्छतेबद्दल जागरूक करावं, असं मोदी म्हणाले.
भाषणात मोदींनी हरिणाच्या हुड्डा सरकारवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या प्रोजेक्टसाठी आचारसंहिता बाजूला सारत त्यांनी परवानगी दिलीय. निवडणूक आयोगानं याकडे लक्ष द्यावं, अशी मागणीही मोदींनी केली.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.