स्वच्छ भारत अभियान

घरात शौचालय असल्यास होणार पगारवाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वच्छ भारत अभियान हरियाणा सरकारनंतर आता राजस्थानमध्येही गंभीररित्या घेतलं आहे. हरियाणानंतर आता राजस्थानमध्येही घरात शौचालय असलं तरच सरकारी कर्मचाऱ्याचा वेतनवाढ होणार आहे. असा नियम या दोन्ही राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.

Nov 30, 2015, 10:32 PM IST

आजपासून रेल्वे, विमान प्रवास, हॉटेलमधील जेवण, मोबाईल फोन महाग

देशात स्वच्छतेला वाव देण्यासाठी चौदा टक्के सेवाकरासोबत अतिरिक्त ०.५ टक्का स्वच्छ भारत अधिभार लागू करण्यात आलाय. आजपासून हा कर लागू झाल्यानं आज रविवारपासून उच्च श्रेणीचा रेल्वे प्रवास महागणार आहे. केवळ रेल्वेच नाही तर तब्बल १२० सेवा यामुळे महाग होणार आहेत.

Nov 15, 2015, 07:12 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिनच्या आवाजात स्वच्छ भारत अभियानाचं अँथम!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्याला आता गातांना दिसणार आहे. सचिननं नुकतंच स्वच्छ भारत अभियानाचं अँथम रेकॉर्ड केलं. सचिन आज ट्विटरवरून ही माहिती दिलीय. स्वच्छ भारत अभियानासाठी आपली आणखी एक मदत असल्याचं त्यानं सांगितलं.

Sep 28, 2015, 03:47 PM IST

स्वच्छ भारत अभियान: चैतालीनं बाबांना मागितलं 'रेडीमेड' शौचालय

आज अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या नया अंदुरा गावात झालेलं एक लग्न 'स्वछ भारत' मोहिमेला एका नव्या अन सकारात्मक वळणावर नेणारं ठरलंय... कारण, या लग्नात वधूनं आपल्या पित्याकडे चक्क शौचालय आंदन देण्याचा अट्टहास धरला होता. अन वधूपित्यानंही स्वच्छतेत शौचालयाचं महत्व जाणत आपल्या मुलीला थेट 'रेडीमेड' शौचालयाचं आंदन देत एक इतिहास घडविलाय. 

May 15, 2015, 09:30 PM IST

'स्वच्छ भारत अभियाना'चं काही भाजप आमदारांनाच वावडं- अनासपुरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाबाबत भाजपचेच काही आमदार उदासिन असल्याचं समोर आलंय. अभिनेता मकरंद अनासपूरे यानंच मुंबईतल्या एका सरकारी कार्यक्रमात याचा गौप्यस्फोट केलाय. 

Feb 5, 2015, 12:12 PM IST

व्हिडिओ: फक्त बोलून नाही, करून दाखवा!

आपल्या कळतं पण वळत नाही किंवा बोलणं खूप सोपी असतं करणं कठीण अशा म्हणी आपण ऐकल्या आहेत. पण आपला परिसर स्वच्छ ठेवणं हे काही कठीण आणि अशक्य काम नाही. त्याचसंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय.  

Jan 1, 2015, 03:46 PM IST