विशाखापट्टनम/भुवनेश्वर : हुडहुड चक्रीवादळाचा फटका आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना बसलाय. या जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसानं आणि जवळपास २०० किलोमीटर प्रती तास धावणाऱ्या वाऱ्यामुळे रविवारी सहा लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तर विशाखापट्टनममध्ये सर्वाधिक लोकांना या तडाख्याचा फटका बसलाय.
आंध्रप्रदेशातील जवळपास दीड लाख तर ओडिसातील १,५६,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री हुडहुड चक्रीवादळाची भयानकता सायंकाळपर्यंत कमी झाली आणि वादळाची गती १००-११० किलोमीटर प्रती तासपर्यंत आली. त्यानंतर या चक्रीवादळानं मोठ्या वादळाचं रूप घेतलं.
या वादळाच्या प्रचंड जोरामुळे विशाखापट्टनम, श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यांना प्रभावित केलं. दुपारपासूनच वीज आणि फोन बंद झाले तसंच रस्ते आणि रेल्वे मार्गांचा संपर्कही तुटला होता.
दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळात सहा लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. यातील तीन जण आंध्रप्रदेशातील तर तीन जण ओडिसातील आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.