125 व्या वर्षात पदार्पण

मुंबई पालिका मुख्यालयाचं 125 व्या वर्षात पदार्पण

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी शुभारंभ सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. 31 जुलै 1893 ला बांधून पूर्ण झालेल्या हेरिटेज इमारतीनं 125 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. यानिमित्तानं आठ कोटी रूपये खर्च करुन सीएसटी इमारतीप्रमाणे पालिका मुख्यालयाला केलेल्या विद्युत रोषणाईचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.

Aug 2, 2017, 09:07 AM IST