aakash tablet

आकाशची लाखाला गवसणी

जगातील सगळ्यात स्वस्त टॅबलेट आकाशची ऑनलाईन बुकिंग अगदी जोरात सुरू आहे. फक्त १४ दिवसात १४ लाख बुकिंग ही ह्या टॅबलेटसाठी झाली आहे.

Jan 3, 2012, 09:20 PM IST

आकाशचा नवा टॅब लवकरच बाजारात

आकाशचं बुकिंग न करु शकल्यामुळे जर तुम्ही निराश झाला असाल तर तुमच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरेल. आकाशची निर्मिती करणाऱ्या डाटाविंड कंपनीने युबीस्लेट 7+ ही नवी टॅबलेट लवकरच बाजारात लँच करण्याचं ठरवलं आहे. युबीस्लेट 7+ साधारणत: २९९९ रुपयांना उपलब्ध होईल अशी शक्यता आहे. या आधीची आकाश युबीस्लेट 7 टॅब फक्त विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध होती पण ही नवी टॅब सर्वांसाठी आणि सर्वत्र मिळणार आहे.

Dec 28, 2011, 07:38 PM IST

'आकाशा'त परत भरारी मारण्याची संधी

आकाश टॅबलेटचं बुकिंग करण्याची संधी ज्यांनी गमावली त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. डाटाविंड कंपनीने १५ डिसेंबरला aakashtablet.com या संकेतस्थाळवर आकाशसाठी ऑनलाईन बुकिंगची सूविधा उपलब्ध करुन दिली होती. आता ज्यांना त्यावेळेस या संधीचा लाभ घेता आला नव्हता त्यांना NCarry.com. या संकेतस्थळावर बुकिंग करता येणार आहे.

Dec 26, 2011, 03:28 PM IST

आकाश टॅबलेट ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेटचे निर्माते डाटाविंडने ३०,००० टॅबलेटची प्रत्येकी २५०० रुपये किंमतींनी ऑनलाईन विक्री सुरु केली आहे. ऑनलाईन ऑर्डर नोंदवल्या नंतर सात दिवसात डिलिव्हरी देण्यात येणार आहे.

Dec 14, 2011, 05:27 PM IST

‘आकाशा’त भरारी मारण्याची संधी

जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशची निर्माती डाटाविंडने विद्यार्थी आणि सोशल नेटवर्किंग स्टार्टअपसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आकाशचे निर्माते डाटाविंड यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट ऍप्लिकेशन्स आकाशमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

Nov 29, 2011, 12:46 PM IST

'आकाशा'ला गवसणी

जगातील सर्वात स्वस्त ३००० रुपये किंमतीची टॅबलेट आकाशला तीन लाखाचं बुकिंग प्राप्त झालं आहे. आकाश पुढच्या महिन्यात बाजारात उपलब्ध होईल. इंग्लंडच्या डाटाविंडची निर्मिती असलेलं आकाशचं सबसिडाईझ्ड मॉडेल सध्या शाळा आणि महाविद्यालांमध्ये मोफत वितरीत करण्यात येत आहे

Nov 17, 2011, 03:03 PM IST