accident news

VIDEO : जत्रेतला पाळणा अचानक थांबल्याने सुरु झाल्या किंकाळ्या... 50 लोकांचा जीव टांगणीला

Delhi Viral Video : दिल्लीच्या नरेला येथे नवरात्रोत्सवादरम्यान मोठा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्धातास बंद पडलेल्या आकाशपाळण्यातून तब्बल 50 जणांची सुटका करण्यात आली आहे.

Oct 19, 2023, 12:19 PM IST

दारात बसून बुट घालत असतानाच माकडानं उडी मारली अन्...; भंडाऱ्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू

Bhandara Accident : भंडाऱ्यातून ही विचित्र घटना समोर आली आहे. भंडाऱ्यात माकडांच्या वाढत्या उच्छादामुळे एका व्यक्तीचा बळी गेला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी वनविभागाने कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Oct 18, 2023, 11:04 AM IST

मुलाची वाट पाहत उभ्या असलेल्या आईला ट्रकने चिरडलं; मृतदेहाची अवस्था पाहून मुलाने फोडला टाहो

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ट्रक चालकाच्या चुकीमुळे वृद्ध महिलेचा बळी गेला आहे. ट्रक मागे घेत असताना चाकाखाली आल्याने वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Oct 16, 2023, 10:40 AM IST

नदीत बुडणाऱ्या चार मुलांना गावकऱ्यानं वाचवलं, मात्र स्वतः बुडाला; कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Kalyan Accident : कल्याणच्या उल्हास नदीत बुडणाऱ्या चार मुलांना गावकऱ्याने वाचवलं. मात्र मुलांना वाचवणारी व्यक्तीच नदीत बुडाल्याने खळबळ उडाली होती. स्थानिकांनी त्या व्यक्तीला बाहेर काढून रु्ग्णालयात दाखल केले होते.

Oct 16, 2023, 09:37 AM IST

VIDEO : कानठळ्या बसवणारा आवाज झाला अन् मुंबई गोवा महामार्गावरील पूल मधोमध तुटला

Mumbai Goa highway Accident : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर मोठा अपघात घडलाय. मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग सकाळी आठ वाजता कोसळ्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Oct 16, 2023, 09:10 AM IST

देवदर्शनावरुन परतणाऱ्या सात भाविकांचा अपघाती मृत्यू; कार कापून बाहेर काढावे लागले मृतदेह

Tamil Nadu Accident : तमिळनाडूमध्ये रविवारी सकाळी तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगम येथे भीषण रस्ता अपघात झाला. कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला. चेंगम पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे सांगितले.

Oct 15, 2023, 03:09 PM IST

स्पीड ब्रेकरमुळे गेला सामाजिक कार्यकर्त्याचा जीव; धक्कादायक घटना CCTV त कैद

Sanglie Accident : सांगलीत स्पीड ब्रेकरमुळे एका सामाजिक कार्यकर्त्याचा बळी गेला आहे. स्पीड ब्रेकरवरुन पडल्याने बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सांगलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Oct 15, 2023, 11:33 AM IST

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू; सैलानी बाबाच्या दर्शनास गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला

Samriddhi Highway Accident: संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. यात प्राथमिक माहितीनुसार 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

Oct 15, 2023, 06:36 AM IST

साताऱ्यात कार अपघातात बहिण भावाचा मृत्यू; गाडीची अवस्था पाहून पोलिसही हादरले

Satara Accident : साताऱ्यातील कराड येथे झालेल्या या भीषण अपघातात बहीण भावासह भाच्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Oct 14, 2023, 04:08 PM IST

Video : टोलनाक्यावर कारचा भीषण अपघात; एका क्षणात झाले दोन तुकडे

UP Accident : उत्तर प्रदेशच्या एका टोलनाक्यावर झालेल्या अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वेगात असलेली कार टोलनाक्यावर असलेल्या डिव्हाईडराला धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे. 

Oct 14, 2023, 03:45 PM IST

भंडाऱ्यात कार आणि बसची समोरासमोर धडक; बसमध्ये होते 26 प्रवासी

Bhandara Accident : भंडाऱ्यात चारचाकी वाहनाची आणि बसची समोरासमोर धडक बसल्याने मोठा अपघात घडला आहे. या अपघातात कारमधील दोघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Oct 12, 2023, 02:06 PM IST

मृत्यूला चकवा देऊन घरी परतत असतानाच तरुणाचा मृत्यू; बारामतीमधील धक्कादायक घटना

Pune News : बारामती शहराच्या रिंगरोड परिसरात रुग्णालयातून घरी परतणाऱ्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. रस्ते अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याची आईदेखील गंभीर जखमी झाली आहे. आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Oct 8, 2023, 03:58 PM IST

नाशिक हादरलं! प्रसुतीदरम्यान बाळ हातातून सटकल्याने अर्भकाचा मृत्यू

Nashik News : नाशिकमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसुतीदरम्यान एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. शिकाऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देत असताना हा सगळा प्रकार घडल्याचा दावा कुटंबियांनी केला आहे.

Oct 4, 2023, 02:50 PM IST