भाजीपाला खरेदीला जावं, त्या वेगानं गौतम अदानींनी खरेदी केली 'ही' कंपनी; व्यवहाराचा आकडा पाहिला?

Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर येताच अदानींकडून आणखी एका कंपनीची मालकी सूत्र मिळवण्यात यश... इतक्या सहजपणे खरेदी केली कंपनी, की पाहणारेही अवाक्   

सायली पाटील | Updated: Aug 31, 2024, 08:48 AM IST
भाजीपाला खरेदीला जावं, त्या वेगानं गौतम अदानींनी खरेदी केली 'ही' कंपनी; व्यवहाराचा आकडा पाहिला?  title=
business news Gautam Adani Firm APSEZ Buy Stake of 80 percent in 185 million dollar

Gautam Adani : गौतम अदानी यांनी भारतासह जगातील श्रीमंतांच्या यादीत मानाचं स्थान मिळवताच व्यवसाय क्षेत्रामध्ये अनेक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. अंबानींच्या गडगंज श्रीमंतीलाही मागे टाकणाऱ्या याच गौतम अदानी आणि अदानी उद्यागसमुहाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा व्यवहार करण्यात आला. प्रत्यक्षात हा व्यवहार मोठा आणि तितकाच महत्त्वाचा असला तरीही अदानींकडून तो अगदी सहज आणि सराईतासारखा करण्यात आला आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

पाय लांब करण्यासाठी गेलेली एखादी व्यक्ती ज्याप्रमाणं माघारी येताना भाजीपाला किंवा एखादी गृहोपयोगी वस्तू घेऊन येते, त्याप्रमाणे अदानींनी या कंपनीशी कारर केल्यामुळं त्याविषयीच्या चर्चा अधिक होताना दिसत आहेत. 

अदानी समुहाचाच एक भाग असणाऱ्या अदानी पोर्ट अँड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) नं शुक्रवारी जारी केलेल्या माहितीनुसार त्यांनी एका कंपनीमध्ये 80 टक्के भागिदारीसाठी करार केला आहे. ग्लोबल कंपनी एस्ट्रोमध्ये ही भागिदारी मिळवण्यात आली असून, 185 मिलियन डॉलर रोकड देत हा व्यवहार पार पडला. थोडक्यात या 80 टक्के भागिदारीसाठी 1552 कोटींचा व्यवहार झाला. 

हेसुद्धा वाचा : काँग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच, एक भाजप तर दुसरा राष्ट्रवादीच्या वाटेवर

 

अदानींनी ज्या एस्ट्रो नामक कंपनीशी हा व्यवहार केला ती कंपनी मध्य आशियाई देश, भारत, पूर्व आशियाई देश आणि आफ्रिकेमध्ये एक अग्रगणी OSV ऑपरेटर कंपनी असून, या कंपनीकडे 26 OSV अर्थात मोठ्या जहाजांची व्यवस्था असूनु, त्यामध्ये अँकर हँडलिंदग टग, फ्लॅट टॉप बार्ज, मल्टीपर्पज सपोर्ट वेसल, वर्कबोट यांचा समावेश आहे. जासगित स्तरावर सागरी मार्गानं आणि बंदरांवरून होणाऱ्या व्यवसायामध्ये पाय आणखी घट्ट रोवण्यासाठी अदानी समुहाकडून हा करार करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 

इथं झाला व्यवहार, तिथं शेअरला उसळी... 

इथं अदानींच्या या व्यवहाराची चर्चा असतानाच तिथं अदानी पोर्टच्या शेअरची किंमत 0.46 टक्क्यांनी वाढून 1482.65 रुपयांवर पोहोचला. यापूर्वी हा शेअर 1475.85 रुपयांपर्यंत मजल मारू शकला होता. या शेअरच्या धर्तीवर कंपनीच्या मार्केट कॅपचा आकडा पाहायचा झाल्यास ही किंमत 3.20 लाख कोटींवर पोहोचली. आश्चर्याची बाब म्हणजे मागील वर्षभरात या शेअरनं 81 टक्के परतावा दिल्यामुळं शेअर बाजारात गुंतवणुकदारांमध्ये याच शेअरची चर्चा आहे.