ajit pawar

NCP : शरद पवार यांचं धक्कातंत्र, अजित पवार साईड ट्रॅकवर? दादा म्हणतात 'हृदयात महाराष्ट्र...'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशीच शरद पवार यांचं धक्कातंत्र पाहिला मिळालं. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करत पवारांना मास्टरस्ट्रोक लगावला आहे. 

Jun 10, 2023, 02:45 PM IST

Video : शरद पवार भाषण करताना अजित पवार याचं काय चाललं होतं?

Sharad Pawar : काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याची वक्तव्य केल्यानंतर आता शरद पवार यांनी पक्षात मोठे बदल केले आहेत. शरद पवार यांनी शनिवारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षांची घोषणा केली. पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पवार यांनी ही घोषणा केली

Jun 10, 2023, 02:44 PM IST

पवारांना जीवे मारण्याच्या धमकीबद्दल बोलताना CM शिंदेंचा ठाकरे गटावर अप्रत्यक्ष आरोप! म्हणाले, "औरंगजेब, टिपू..."

CM Eknath Shinde On Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांना ट्वीटरवरुन देण्यात आलेल्या धमकीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आवश्यकता असल्यास पवारांची सुरक्षा वाढवली जाईल असंही म्हटलं आहे. मात्र याचवेळेस त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Jun 9, 2023, 06:29 PM IST

"मी धमक्यांची चिंता करत नाही, पण..."; जीवे मारण्याच्या धमकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar First Comment On Death Threat: शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणासंदर्भात चर्चा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Jun 9, 2023, 04:06 PM IST

Sharad Pawar Threat : शरद पवार धमकी प्रकरणाचं अमरावती कनेक्शन, धमकी देणारा भाजपाचा कार्यकर्ता?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेचे राज्यात पडसाद उमटतायत. आता या प्रकरणाचं अमरावती कनेक्शन समोर आलं आहे. धमकी देणारा हा भाजप कार्यकर्ता असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. 

Jun 9, 2023, 02:50 PM IST

काका शरद पवारांना धमकी मिळाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले "त्या सौरभ पिंपळकरच्या Bio मध्ये BJP...."

Death Threat to Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली असून, अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया देताना कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच धमकी देणाऱ्याच्या ट्वीटर (Twitter) बायोमध्ये भाजपा कार्यकर्ता उल्लेख असून त्यासंबंधी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. 

 

Jun 9, 2023, 01:02 PM IST

फडणवीसांची थेट अमित शाहांकडे तक्रार! सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातही..."

Supriya Sule Slams Home Ministry Mentions Amit Shah: सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि समोर येत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांचा उल्लेख करत सरकारला लक्ष्य केलं.

Jun 9, 2023, 12:22 PM IST

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी! "जर काही झालं तर..."; सुप्रिया सुळेंचा इशारा

Sharad Pawar Death Threat: सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना या प्रकरणाबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्यांनी राज्य तसेच केंद्र सरकारकडे पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचं म्हटलं.

Jun 9, 2023, 11:46 AM IST

"लवकरच तुमचा दाभोलकर होईल"; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

Sharad Pawar Death Threat: शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासहीत आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटायला गेल्या असून त्यांनी हा मुद्दा आयुक्तांकडे मांडला.

Jun 9, 2023, 10:47 AM IST