Maharashtra Assembly Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधात भूमिका घेत थेट उठावाची भाषा केलीय.. सुरूवातीला अधिकृत माहिती आल्याशिवाय ईव्हीएमबद्दल बोलणार नाही असं म्हणत शरद पवारांनी पराभव स्विकारला होता. मात्र आता विधानसभेच्या निकालांच्या आकड्यात गडबड वाटत असल्याचं म्हणत पवारांनी जनतेनं उठाव करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केलाय.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. पैशांचा येवढा वापर कधीही झाला नसल्याचंही शरद पवार म्हणालेत. जनतेनं आता याबाबत उठाव कऱण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणालेत. तसेच शेवटच्या दोन तासात वाढलेलं मतदान धक्कादायक असल्याचं शरद पवार म्हणालते. पुण्यातील बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.. पहिल्यांदाच शरद पवार यांनी ईव्हीएमच्या विरोधात असं टोकाचं वक्तव्य केलंय. नेहमीच संविधानाच्या चौकटीत बोलणाऱ्या शरद पवारांनी पहिल्यांदाच उठावाची भाषा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माळशिरसच्या मारकडवाडी गावात गावक-यांनी मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्याचा निर्णय घेतलाय. या गावातून उत्तम जानकरांचे विरोधक राम सातपुतेंना जानकरांपेक्षा अधिक मतं मिळालीत. त्यामुळे जानकरांच्या समर्थकांनी स्वखर्चातून पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांना 843 तर भाजप उमेदवार राम सातपुतेंना 1 हजार 3 मतं मिळालीत. 2009, 2014, 2019 च्या विधानसभा निवडणूक आणि 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचं 80 टक्के मतदान जानकरांना किंवा त्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला झालंय, असा दावा गावकऱ्यांनी केलाय. त्यामुळे या विधानसभा निकालासंदर्भात गावकऱ्यांनी थेट EVMवर संशय व्यक्त केलाय. मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतलाय. या प्रक्रियेसाठी सरकारी कर्मचारी मिळावे, अशी मागणी गावक-यांनी निवेदनाद्वारे तहसीलदाराकडं केलीय.