केळी शेतकऱ्यांची व्यथा कुणी ऐकणार का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या भागातील वादळी वाऱ्यामुले शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केळी पिकाचे नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सुचना दिल्या जातात, मात्र प्रशासनाकडून पाहिजे ती मदत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
Jun 7, 2022, 04:32 PM IST