जेलमध्ये दहशतवाद्यांकडे मिळाले काजू, बदाम, भांडी आणि शेगडी
सेंट्रल जेलमधून सिमीचे ८ दहशतवादी फरार झाल्याच्या घटनेनंतर जेलमध्ये सर्च ऑपरेशन चालवलं जात आहे. या जेलमध्ये आणखी २१ दहशतवादी आहेत. सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. यामध्ये काजू, बदाम, किसमिस, खजूर यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. शिवाय जेवन बणवण्याची एक शेगडी आणि काही भांडी पोलिसांना मिळाली आहेत.
Nov 2, 2016, 11:06 AM ISTभोपाळ दहशतवादी एन्काऊंटर प्रकरणात नवा खुलासा
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जेलमधून दहशतवादी फरार झाले आणि काही तासांमध्येच पोलिसांनी त्यांना ठार केलं. या ऐन्काऊंटरनंतर अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले. अनेक वेगवेगळे खुलासे यानंतर होत राहिले. यामध्ये आता एक नवा खुलासा झाला आहे की, सिमीच्या या दहशतवाद्यांची साक्ष आणि सुनावणी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे होतं होती. त्यांना कोर्टात नेलं जात नव्हतं. या दरम्यान ते पसार होण्याचा प्रयत्न करु शकतात अशी शंका पोलिसांना होती.
Nov 2, 2016, 09:43 AM ISTभुतांमुळे शेतकरी आत्महत्या करतात- भूपेंद्र सिंह
मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी विधानसभेत अजब दावा केला आहे. पिक समाधानकारक न आल्यामुळे नाही, तर भूत व प्रेतांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं मंत्रिमहोदयांनी म्हटलंय.भूपेंद्र सिंह यांच्या उत्तरानंतर विधानसभेत आमदारांनी मोठा गोंधळ सुरू केला.
Jul 20, 2016, 07:45 PM IST