bjp mega bharti

Mumbai Chandrakant Patil PC 18Th Jan 2020 PT8M22S

मुंबई । मेगाभरतीबाबत माध्यमांनी विपर्यास चालवला - चंद्रकांत पाटील

भाजप मेगाभरतीबाबत माध्यमांनी विपर्यास चालवला, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी वादावर पडदा टाकण्याचे काम केले. मात्र, माध्यमांवर खापर फोडले. भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांनीच केलेल्या वक्तव्यावरुन ४८ तासांत घुमजाव करावे लागले आहे. मात्र, मेगाभरतीच्या निमित्ताने भाजपमधील जुने कार्यकर्ते, नाराज कार्यकर्ते यांना पक्षातील सद्यस्थितीबद्दल बोलण्याची संधीच मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मेगाभारती ही एक चूक होती, यामुळे भाजपची संस्कृती बिघडली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मी आधीपासून याला विरोध करत होतो. आता ही मेगाभरती चुकीची होती, हे जाणवत आहे. या मेगाभरतीमुळेच भाजपला पराभवाचा अनेक ठिकाणी सामना करावा लागला आहे. पक्षातील लोकांना संधी मिळाली असती तर आज राज्यात वेगळे चित्र पाहायला मिळाले असते, असा समाचार खडसे यांनी घेतला आहे.

Jan 18, 2020, 08:15 PM IST

'भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट'

 भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Jan 18, 2020, 07:38 PM IST

भाजप मेगाभरती : चंद्रकांत पाटील 'त्यांना' काढून चूक सुधारा - नवाब मलिक

भाजपची मेगाभरती ही चूक असल्याचे वक्तव्य  चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीने भाजपला टोला लगावला आहे. 

Jan 18, 2020, 01:16 PM IST