शिवसेनेने गोड बोलून युती तोडायला हवी होती - नितीन गडकरी
शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत सेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Jan 28, 2017, 09:10 AM ISTयुती तुटल्यानंतर सेना-भाजपचे खासदार प्रथमच आमने-सामने
सालाबादप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाच्या आधी होणाऱ्या बैठकीत युती तुटल्यावर प्रथमच शिवसेना आणि भाजपचे खासदार आमने-सामने येणार आहे. पण बैठकीला शिवसेनेचे खासदार जाणार की नाही याबद्दलचा निर्णय अजूनही झालेला नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय.
Jan 27, 2017, 10:24 AM ISTयुती तुटल्यानंतर मनसे आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
शिवसेना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून युती तुटल्याचा आनंद साजरा केला. विरार मनवेलपाडा तलावासमोर महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेनेच्या पदाधिका-यांनी दोन्ही पक्षाचे झेंडे फडकवित फटाक्याची अतिषबाजी करत आपला अनंद साजरा केला. या निमित्ताने विभागलेले दोन भाऊ पुन्हा एकत्र यावेत आणि मुंबई महापालिकेवर भगवा फडकावा अशी अपेक्षाही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
Jan 27, 2017, 09:01 AM IST