Elephanta Caves Boat Accident : पहिल्या 30 मिनिटात 'तो' ठरला देवदूत, 3 वर्षांच्या चिमुकलीसह 25 जणांना वाचवलं

Elephanta Caves Boat Accident : मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथे बोट अपघातनंतर पहिल्या 30 मिनिटात मोहम्मद आरिफ बामने हा 25 जणांसाठी देवदूत ठरला. 3 वर्षांच्या मुलीला रेस्क्यू केल्यानंतर ती श्वास घेत नव्हते, तेव्हा आरिफने....

नेहा चौधरी | Updated: Dec 19, 2024, 08:14 PM IST
Elephanta Caves Boat Accident : पहिल्या 30 मिनिटात 'तो' ठरला देवदूत, 3 वर्षांच्या चिमुकलीसह 25 जणांना वाचवलं title=
mumbai boat accident

Elephanta Caves Boat Accident : बुधवार (18 डिसेंबर 2024) दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथल्या समुद्रात एक प्रवासी बोट उलटल्याने 13 जणांचा मृत्यू झाला. एलिफंटाकडे जाणा-या नीलकमल बोटीला नेव्हीच्या बोटीनं धडक दिली आणि 110 जणांचा जीव धोक्यात आला. बोट उलटल्यानंतर या सगळ्यांची समुद्रात मृत्यूशी झुंज सुरू झाली. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती. या बोटीवर मुंबईबाहेरीलदेखील पर्यटकही होते. नीलकमल नावाची बोट 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाकडे निघाली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अपघात झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटात दुसऱ्या बोटीवर असलेल्या मोहम्मद आरीफ बोमन त्या 25 जणांसाठी देवदूत ठरला. 

पहिल्या 30 मिनिटात 'तो' ठरला देवदूत

समुद्रात हा थरार सुरू असतानाच बोटी बुडल्याच कळताच पूर्वा बोटावरील आरिफ बामणे पुढच्या क्षणी लोकांना रेस्क्यू करण्यासाठी पोहोचले. मदत कार्य येण्यापूर्वीच आरिफ बामनेने जवळपास 25 जणांची सुखरुप सुटका केली. ज्यावेळी आरिफ दुर्घटनाग्रस्त बोटीजवळ पोहोचले ते दृष्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. लोकांचा आक्रोश आणि वाचवा वाचवा अशी हाक...सगळं निशब्द करणारे दृश्य होतं. समोर मृत्यू दिसणाऱ्या त्या निष्पाप जिवांना वाचवण्यासाठी आरिफ समोर आले आणि शक्य तितक्या लोकांना मृत्यूच्या दाढेतून आरिफ यांनी परत आणलंय.

ज्या बोट दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, त्या घटनेचे साक्षीदार ठरलेले आरिफ यांनी तो थरारक प्रसंग सांगितला. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. ज्या लोकांजवळ लाइफ जॅकेट नव्हते त्यांना ते देऊन त्यांना बोटीवर सुखरुप घेण्यात आले. आरिफ यांनी सांगितलं की, अपघात इतक्या भयानक होता की, 5 ते 10 मिनिटातच बोट बुडाली. त्याक्षणी बोटीवरील काही लोकांना लाइफ जॅकेट मिळवण्यात यश आलं पण काही लोक अपयशी ठरले. 

शक्य तितक्या लोकांना वाचवण्यासाठी आरिफ धडपडत होते. इतक्यात त्यांचं लक्ष एका छोट्या मुलाकडे गेलं. या रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी आरिफ यांनी एका साडेतीन वर्षांच्या मुलीला जीवदान दिलं. आरिफ यांनी कसलाही विचार न करता तिच्या दिशेनं धाव घेतली आणि तिला वाचवलं. मात्र पाण्यातून काढल्यानंतर त्या मुलीचा श्वासोच्छवास पूर्णपणे थांबल्याचं आरिफ यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेचच तिला पोटावर झोपवून तिच्या पोटातील पाणी बाहेर काढलं छाती दाबून. त्यामुळे तिचं श्वास परत सुरु झाला अन् तिच्या आईने या देवदूताचे आभार मानले. एका छोट्या मुलीचा जीव वाचवण्याची ही घटना ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल.

समोर मृत्यू दिसलेल्या त्या लोकांनी आरिफच्या रूपाने देव बघितला, हे मात्र निश्चित आहे.आरिफ यांची बोट ही एक पायलट बोट होती. पायलट बोट म्हणजे समुद्रातील मोठ्या बोटींना समुद्र किनाऱ्यावर आणण्यासाठी त्यांना दिशा देण्याच काम करतं. समोर मृत्यू दिसलेल्या त्या लोकांनी आरिफच्या रूपाने देव बघितला, हे मात्र निश्चित आहे.