मनसेची मागणी, कोळसा घोटाळा मंत्री राजीनामा द्या
कोळसा घोटाळ्यात हात काळे झालेल्या राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी पहिल्यांदाच मनसेनं केली. त्यामुळे आता मनसेने कोळसा घोटाळ्यावरही आवाज उठविला आहे.
Sep 8, 2012, 08:50 PM ISTसीबीआय कारवाई फिक्स होती- केजरीवाल
`कोळसाखाण वाटप झालेल्या कंपन्यांवर झालेली सीबीआय कारवाई फिक्स होती` असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केलाय. दोन दिवसांअगोदरच सीबीआय छापे टाकणार हे संबधित कंपन्यांना माहिती झाली होती. त्यामुळं ही कारवाई म्हणजे धुळफेक असल्याचा आरोप केजरीवालांनी केलाय.
Sep 6, 2012, 04:41 PM ISTभाजप म्हणजे ब्लॅकमेलर- सोनिया गांधी
कोळसाखाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी `कॅग`ने ठेवलेल्या ठपक्यामुळे आणि त्यावरून विरोधक घालत असलेल्या गोंधळामुळे दबून न जाता उलट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज भाजपावरच पलटवार केला. भाजप खरा राजकीय पक्षच नाही. भाजप नेहमी ब्लॅकमेलिंगचं राजकारण करतं. त्यावरच त्यांची रोजीरोटी चालते.
Aug 28, 2012, 01:27 PM ISTहजारों जवाबोंसे अच्छी मेरी खामोशी- पंतप्रधान
आज लोकसभेत निवेदनाला सुरूवात करतानाच ‘कॅगचे निष्कर्ष अयोग्य असून माझ्यावर होणारे आरोप निराधार आहेत’ असा पवित्रा पंतप्रधानांनी घेतला. माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी संसदेत दिलं.
Aug 27, 2012, 12:55 PM ISTआज पंतप्रधानांच्या निवेदनाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून संसदेत गोंधळ सुरू आहे. आजतरी संसदेचं कामकाज चालणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संसदेत आज बारा वाजता पंतप्रधान निवेदन कऱण्याची शक्यता आहे. तर रणनिती आखण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक सुरु आहे.
Aug 27, 2012, 11:54 AM IST