coal scam

डॉ. मनमोहन सिंह यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

डॉ. मनमोहन सिंह यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Mar 11, 2015, 01:34 PM IST

डॉ. मनमोहन सिंह यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना पटियाला कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी कोर्टाने हे आदेश दिले आहेत. मनमोहन सिंह यांना ८ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Mar 11, 2015, 11:44 AM IST

कोळसा घोटाळा: माजी पंतप्रधानांची चौकशी होण्याची शक्यता

कोळसा घोटाळाप्रकरणी तत्कालीन कोळसामंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्यात यावा असा आदेश विशेष न्यायालयानं सीबीआयला दिला आहे. 

Dec 16, 2014, 06:22 PM IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अडचणीत

कोळसा घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अडचणी आलेत. कोळसा घोटाळ्यातील तपासावरुन पटीयालातील विशेष कोर्टानं आज सीबीआयला फटकारलं.

Nov 25, 2014, 01:14 PM IST

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, २१४ कोळसा खाणींचं वाटप रद्द

सुप्रीम कोर्टानं १९९३ सालापासून वाटप करण्यात आलेल्या २१८ कोळसा खाणींपैकी २१४ खासगी कोळसा खाणींचं वाटप रद्द केलं आहे. 

Sep 24, 2014, 05:34 PM IST

1993नंतरचे कोळसा खाणवाटप बेकायदा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

१९९३ नंतरचे सगळे कोळसा खाण वाटप आज सुप्रीम कोर्टानं रद्द केले आहेत. या वाटपामध्ये कुठलेही निकष पाळले नसल्याचा आणि मनमानीपणे खाण वाटप झाल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले आहेत.

Aug 25, 2014, 03:14 PM IST

पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं- माजी कोळसा मंत्री

कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारीखनं सरळसरळ पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. खाण वाटपामध्ये घोटाळा झाला असल्याचं सीबीआयला वाटत असल्यास पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं कारण खाण वाटपाशी संबंधित कागदपत्रांवर पंतप्रधानांनीच स्वाक्षरी केलीय अशी मागणी पी. सी. पारीख यांनी केलीय.

Oct 16, 2013, 01:44 PM IST

महाराष्ट्रात `आदर्श कोळसा घोटाळा`!

महाराष्ट्रातही कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या य़ांनी केलाय. मंत्री, सनदी अधिकारी आणि माफीया यांच्यातल्या साटेलोट्यातून हा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.

Jul 6, 2013, 11:23 PM IST

कोळसा घोटाळा : सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

कोळसा घोटाळ्याच्या सीबीआयच्या अहवालावरुन, सुप्रीम कोर्टानं सरकार आणि सीबीआयला फटकारलय. सीबीआयला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करणं ही मुख्य गरज असल्याचं कोर्टानं नमूद केलय.

Apr 30, 2013, 08:42 PM IST

कोळसा घोटाळाः सरकारचे पाय खोल रुतले

कोळसा घोटाळ्यात सरकारचे पाय आणखीनंच रूतले आहेत. चौकशी अहवालात फेरफारासंदर्भात सीबीआय संचालकांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अहवालात सरकारचं पितळ उघडं पडलंय.

Apr 26, 2013, 04:54 PM IST

राज्यातही कोळसा घोटाळा!

कोळसा खाणींचा घोटाळा सर्वत्र गाजत असताना राज्यात कोळसा खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय. वीज वितरण कंपनीनं जास्त दरानं कोळसा खरेदी केल्याचा आरोप होतोय.

Oct 31, 2012, 02:49 PM IST

कोळसा घोटाळ्याचं नागपूर कनेक्शन

कोळसा खाण घोटाळ्याचं नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. कोळसा खाण घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी सीबीआयन आता धाडसत्र हाती घेतलंय. त्यात नागपूरात चार ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकलेत.

Sep 23, 2012, 08:06 AM IST

कोळसा गैरव्यवहार: सीबीआयकडून चौकशी

खाणघोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेल्या मनोज जायसवाल यांच्या अभिजित ग्रुप कंपनीवर आणखी एका आरोपाची भर पडली आहे. दरम्यान, कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज एमएमआर लोखंड आणि स्टिल कंपनीचे संचालक अरविंद जयस्वाल यांची चौकशी केली.

Sep 17, 2012, 04:12 PM IST

त्रिवेदी नव्हे, कोळसा घोटाळा करणारे देशद्रोही- अण्णा

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींच्या अटकेबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही सरकारवर टीका केलीय. कोळसा घोटाळा करणारे देशाला लूटत आहेत. त्यामुळं तेच खरे देशद्रोही असल्याची घणाघाती टीका अण्णांनी केली आहे.

Sep 12, 2012, 06:56 PM IST