cold

थंडीमुळे द्राक्ष उत्पादनावर परिणाम

थंडीमुळे द्राक्ष उत्पादनाच्या प्रतीवर परिणाम होऊन निर्यातक्षम द्राक्षमालाचे नुकसान होत आहे. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी संध्याकाळच्या वेळी पाणी देणे, पहाटे ओल्या पालापाचोळ्याचा धुर करीत शेकोटी करण्याचे उपाय करण्याच्या सूचना कृषी संशोधकांनी केल्या आहे. 

Jan 10, 2017, 11:40 PM IST

राज्यात थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा 5 अंशांवर

राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढतच चालला आहे. काही ठिकाणी पारा 7 अंशाच्याही खाली आलाय.

Jan 7, 2017, 06:04 PM IST

महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड, पारा पोहोचला ७.६ अंशांवर

राज्यात थंडीचा जोर वाढला असून राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद जळगावला करण्यात आलीय.

Dec 26, 2016, 08:51 PM IST

राज्यात थंडीचा कडाका, परभणीमध्ये सर्वात कमी तापमान

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. मराठवाड्यात परभणीचं तापामान थेट  ६.७ अंश सेल्शिअस इतके खाली आले आहे. तर नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये तापमान  ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Dec 22, 2016, 09:13 AM IST

देशभरात थंडीची लाट

उत्तरेत थंडीची लाट आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार श्रीनगरमधील तापमान उणे 4.5 तर लेह येथील तापमान उणे 11.9 अंशावर गेलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा,उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही थंडीची लाट आली आहे. दाट धुक्यामुळे या भागातील रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

Dec 11, 2016, 04:46 PM IST

राज्यात थंडीचा कडाका वाढला, महाबळेश्वरात हिमकण जमा

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात असलेलं महाबळेश्वर कडाक्याच्या थंडीनं गारठलं असून वेण्णा लेक परिसरात  ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

Dec 10, 2016, 09:14 PM IST

राज्यातून थंडी झाली गायब

महाराष्ट्रातल्या विविध भागातून सध्या थंडी गायब झालीय. गेल्या काही आठवड्यांपासून पडणारी गुलाबी थंडी रविवारपासून अचानक गायब झाली असून पुढचे दोन दिवस ती परत येण्याची शक्यता नाही. 

Dec 5, 2016, 08:51 AM IST