राजस्थान | अलवर, भरतपूरातून ५०० बस रवाना
Rajasthan Alwar Congress Government Send Migrant Workers From 500 Buses
May 17, 2020, 08:05 PM ISTकाँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त - साध्वी प्रज्ञा
काँग्रेस सरकारच्या षडयंत्रातून अर्धमुक्त झाले, नऊ वर्ष मी अन्याय सहन केलाय. मुंबई एटीएसकडून माझा छळ करण्यात आला आहे, असा थेट आरोप 8 वर्षानंतर जेल बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषदेत साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलाय.
Apr 27, 2017, 05:22 PM ISTकाँग्रेसला पडलाय आदिवासींचा विसर - नरेंद्र मोदी
स्वातंत्र्याच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षांत त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केलं नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून पालघरमधील सभेत बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर कडाडून टीका करत आपल्या आत्तापर्यंतच्या कामाचा जनतेला लेखाजोगाही दिला.
Oct 13, 2014, 01:37 PM ISTआघाडीचे शासन गतीमान, एका दिवसात 57 'जीआर'
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारनं निर्णय घेण्याचा सपाटाच लावलाय. मंगळवारी एका दिवसात तब्बल 57 'जीआर' (शासन अध्यादेश) काढण्याचा विक्रम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारनं केला. आठवड्यातून दोनदा कॅबिनेटच्या बैठकांचा धडाका सुरू असून, कधी नव्हे ते सरकार जोरात कामाला लागलंय.
Sep 11, 2014, 01:59 PM ISTमहायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात
काँग्रेसच्या सरकारने वाट लावली आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण आघाडी सरकार सध्या हिंदू धर्मीयांवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत आमचे नेते नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले.
Feb 23, 2014, 11:02 PM ISTराहुल गांधींवर भाजप प्रतिक्रिया, नौटंकी सरकार
काँग्रेसचे युवा नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानावर भाजपनं तीव्र शब्दांत टीका केली आहे. हे काँग्रेस नव्हे, नौटंकी सरकार असल्याचा टोमणा भाजप प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे.
Sep 27, 2013, 03:20 PM ISTया पुढे श्रीमंतांवर जास्त कर?
काँग्रेस सरकारने महागाईवर उतारा शोधण्यास सुरूवात केली आहे. तसेच वित्तीय तुट भरून काढण्यासाठी नवा फंडा शोधण्याचा चंग बांधलाय. आता तर केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी अतिश्रीमंतांवर जास्त कर आकारण्याच्या मुद्याचा विचार झाला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
Jan 24, 2013, 04:47 PM ISTसरकारची मुस्कटदाबी, संघासह २० खाती बंद!
सरकारने राष्ट्राच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत ट्विटरवरील २० खाती बंद केली आहेत. पूर्वोत्तर राज्यांतील नागरिकांच्या विरुद्ध पसरणाऱ्या अफवा रोखण्याच्या नावाखाली सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र पांचजन्य, प्रविण तोगडीया आणि नरेंद्र मोदींचंही अकाऊंट ब्लॉक केलं आहे.
Aug 24, 2012, 05:47 PM IST