congress

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

Shard Pawar : राज्यात पुन्हा मोठा एकदा मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. या संदर्भात शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पुण्यात सुरु आहे. 

Feb 14, 2024, 11:31 AM IST

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...

Feb 13, 2024, 11:18 PM IST

इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?

Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे. 

Feb 13, 2024, 10:17 PM IST

'अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले! ED, CBI ला घाबरून गेले का?'

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा घणाघात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे. अशोक चव्हाण काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ED, CBI ला घाबरून गेले का? जनतेला उत्तर द्या असं चेन्नीथाल यांनी म्हटलं आहे.

Feb 13, 2024, 06:20 PM IST

अमित शाह महाराष्ट्रात येण्याआधीच अशोक चव्हाणांना भाजपात प्रवेश का? वाचा इनसाईड स्टोरी

Ashok Chavan Join BJP : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवू शकते अशी चर्चा सुरु आहे. बुधवारी अशोक चव्हाण उमेदवारीही दाखल करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

Feb 13, 2024, 03:23 PM IST

काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग, राज्याचे प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला

Maharashtra Politics : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईत आज प्रदेश काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना फोन केला.

 

Feb 13, 2024, 02:27 PM IST