पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात आकर्षक सजावट
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आंब्याची पाने, तांब्याचा गडवा, नारळाच्या सजावटीने साकारलेला शुभकलश, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक झुंबरे आणि विविधरंगी फुलांनी सजलेल्या मंदिरात लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. दिवाळीनिमित्त मंदिराचा परिसर आकाशकंदिल, पणत्या आणि रांगोळीच्या पायघडयांनी सजवण्यात आला.
Oct 27, 2019, 10:35 AM IST