dahihandi

मुंबईतील गोविंदाचा नवी मुंबईत शॉक लागून मृत्यू

 मुंबईतील गोविंदाचा ऐरोली येथे मृत्यू शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक  घटना संध्याकाळी घडली. यामुळे गोविंदा उत्सहाला गालबोट लागले. पावसामुळे गेटला शॉक लागून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Aug 15, 2017, 10:05 PM IST

स्वातंत्र्यदिनावर दहशतवादाचं सावट, मुंबईत हाय अलर्ट

स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडी यावर्षी एकाच दिवशी आल्याने मुंबईत हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. दोन्ही सण एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दीची शक्यता आहे. त्याचा फायदा घातपाती कारवायांसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 

Aug 14, 2017, 07:07 PM IST

मुंबईतील दहीहंडीत इतक्या आयोजकांची माघार

 'मच गया शोर' म्हणत सारे गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. चौकाचौकात दहीहंडीचा सराव करणारी पथके दिसू लागली आहेत पण ऐनवेळी बहुतांश आयोजकांनी यातून माघार घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गोविंदा थरावर थर रचण्याची तयारी करत असले तरी यंदा आयोजक याबाबतीत उत्साही नसल्याने उत्सवावर याचा परिणाम झालेला दिसेल.

Aug 14, 2017, 05:37 PM IST

दहीहंडीला लाऊडस्पीकर व्यावसायिकांचा बेमुदत संप

गोविंदा रे गोपाळ..... असं म्हणतं गोविंदा दहीहंडीच्या दिवशी घराबाहेर पडतात. रस्त्यावर किंवा आयोजकांच्या इथे म्हणा या गोविंदा पथकांचं स्वागत दहीहंडीच्या गाण्यांनी केलं जातं.

Aug 10, 2017, 07:58 PM IST

हायकोर्टांने दहीहंडीवरील निर्बंध हटवले

 दहीहंडीच्या सणावर घालण्यात आलेले वय आणि उंचीचे विधीमंडळानं ठरवावेत असा निर्णय आज मुंबई उच्चन्यायालयानं दिला आहे. त्यामुळे आता  सरकारनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार १४ वर्षाखालच्या गोविंदांना दहीहंडीच्या खेळात सहभागी होता येणार नाही.

Aug 7, 2017, 02:49 PM IST

उत्सवांचं बाजारीकरण थांबवा - राज ठाकरे

उत्सवांचं सुरु असलेलं बाजारीकरण थांबवा, मग आयोजनांवर कुणीच हरकत घेणार नाही असा सल्ला वजा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीला केलाय. 

Jul 7, 2017, 03:14 PM IST

दहीहंडी, गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

 दहीहंडी आणि गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमदार अनिल परब, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, तृप्ती सावंत यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Jul 6, 2017, 12:37 PM IST

राज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'

राज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'

Aug 28, 2016, 08:14 PM IST

राज ठाकरेंचा नारायण राणेंवर 'प्रहार'

दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Aug 28, 2016, 06:28 PM IST