हा होणार सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंवर कारवाई झाली आहे.
Mar 28, 2018, 04:41 PM ISTस्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिज वॉर्नरवर बंदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 28, 2018, 03:29 PM ISTआयपीएलमध्ये नाही खेळणार स्मिथ आणि वॉर्नर
बॉल कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची बंदी घालण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उप कर्णधार डेविड वॉर्नर आयपीएलच्या ११व्या हंगामात खेळणार नाहीयेत. येत्या ७ एप्रिलपासून आयपीएलच्या घमासानाला सुरुवात होतेय. स्मिथ आणि वॉर्नर यांचा सहभाग नसल्याने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स आणि हैदराबाद सनरायजर्स संघाना मात्र मोठा फटका बसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज स्मिथ आणि वॉर्नरबाबत निर्णय़ जाहीर केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये.
Mar 28, 2018, 02:27 PM ISTबॉल टेंपरिंग : स्मिथ-वॉर्नरवर एका वर्षाची तर बेनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी
द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय जाहीर केलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये.
Mar 28, 2018, 02:11 PM ISTस्मिथनंतर आता डेव्हिड वॉर्नरचीही कॅप्टन पदावरून हकालपट्टी
डेव्हिड वॉर्नरनं बॉल टेम्परिंग प्रकरणात अडकल्यानंतर सरतेशेवटी आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय केलाय.
Mar 28, 2018, 01:30 PM ISTऑस्ट्रेलियाने स्वत:चीच उडवली खिल्ली
बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक भूमिका घेत कसोटी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्राफ्ट यांना दोषी ठरवत आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघाबाहेर काढलेय. तर कोच डॅरेन लेहमन यांना क्लीनचिट देण्यात आलीये. बॉल टेंपरिंग प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर चहूबाजूंनी टीका होतेय. ही घटना इतकी गंभीर की ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही यात हस्तक्षेप करावा लागला.
Mar 28, 2018, 12:10 PM ISTचेंडू छेडछाडप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे ३ खेळाडू दोषी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाडप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे ३ खेळाडू माघारी परतणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी ही माहिती दिली आहे.
Mar 27, 2018, 11:15 PM ISTस्मिथवर भडकले ऑस्ट्रेलियन्स, पंतप्रधानांपेक्षा कॅप्टनला जास्त सन्मान
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर चौफेर टीका होत आहे.
Mar 27, 2018, 08:01 PM ISTबॉल टॅम्परिंग : या व्यक्तीने कॅमरामनला म्हटले मॅचमध्ये काही तरी गडबड आहे... जाणून घ्या कसा आला संशय
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर लावण्यात आलेले बॉल टॅम्परिंगच्या आरोपाबाबत दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज फेनी डिव्हिलिअर्स यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी एका रेडिओ शोमध्ये हा खुलासा केला आहे. ते म्हणाले, माझ्याच सांगण्यावरून कॅमरामन जोटानी ऑस्करने बेनक्रॉफ्टला बॉल टॅम्परिंग करतांना रंगेहाथ पकडले. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप लावण्यात आला. यानंतर स्टीव स्थिम याने कर्णधारपदावरून राजीनामा दिला. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाची चौकशी करत आहे.
Mar 27, 2018, 07:17 PM ISTऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये फूट, पार्टी करणाऱ्या खेळाडूला बाहेर काढण्याची मागणी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर चौफेर टीका होत आहे.
Mar 27, 2018, 06:53 PM ISTस्मिथ-वॉर्नरला आयपीएलमधूनही डच्चू?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर कारवाई करण्यात आली आहे.
Mar 27, 2018, 06:29 PM ISTस्मिथ-वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन, प्रशिक्षक लेहमनची हकालपट्टी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे.
Mar 27, 2018, 04:14 PM ISTक्रिकेट ऑस्ट्रेलियाची आपातकालीन बैठक, खेळाडू आणि कोचबाबत आज निर्णय
द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी मंगळवारी द. आफ्रिकेत आपातकालीन बैठक होणार आहे. या बैठकीत कोच डॅरेन लेहमन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदलँड यांच्यावर कारवाईसाठी मोठा दबाव आहे. कारण बॉल टेंपरिंग प्रकरणावरुन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सवर चहूबाजूंनी टीका होते. ऑस्ट्रेलियन मीडियाने तर हे प्रकरण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीला काळिमा असल्याचे म्हटलेय.
Mar 27, 2018, 01:54 PM ISTवॉर्नर आयपीएल खेळणार का? हैदराबादचा मेंटर लक्ष्मण म्हणतो...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला त्यांचं पद गमवावं लागलं आहे.
Mar 26, 2018, 07:34 PM ISTबॉल टेंपरिंग प्रकरण क्रिकेटसाठी काळा दिवस - ऑस्ट्रेलियन मीडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीदरम्यान घडलेले बॉल टेंपरिंगप्रकरण हे खेळासाठी काळा दिवस असल्याचे ऑस्ट्रेलियन मीडियाने म्हटलेय. न्यूलँडसमध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बॉल टेंपरिंगची घटना घडली. यावरुन कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली जातेय.
Mar 26, 2018, 01:34 PM IST