हरयाणात भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचं पानिपत!
महाराष्ट्रासोबतच आज हरयाणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. इथं भाजपचा भगवा फडकण्याची चिन्हं आहेत. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांपैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी असून भाजपला पूर्ण बहुमत मिळालंय. देशातील सत्ता गमावल्यामुळं राजकीयदृष्ट्या कोमात गेलेल्या काँग्रेसला हा जबरदस्त मोठा धक्का मानला जात आहे.
Oct 19, 2014, 07:35 PM ISTगुजरात - भाजपच्या दोन जागा कमी, काँग्रेसच्या दोन वाढल्या
गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ११५ जागांवर तर काँग्रेसने ६१ जागांवर विजय मिळाला. प्रथमच राष्ट्रवादी पक्षाने गुजरातमध्ये खाते खोलत दोन जागांवर विजय मिळविला. तर केशुभाई पटेल यांच्या पक्षाने दोन जागा जिंकल्यात. केशुभाईंनी आपला मतदार संघ सांभाळला.
Dec 20, 2012, 05:45 PM IST