#रणसंग्राम : अंबरनाथमध्ये चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले

नगरपरिषदेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. वॉर्ड क्रमांक ३९मध्ये  चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले आहे. या वॉर्डात  दोन्ही अपक्ष उमेदावाराने जोरदार टक्कर दिली. अपक्ष उमेदवारांना समसमान मते पडलीत. 

Updated: Apr 23, 2015, 03:55 PM IST
#रणसंग्राम : अंबरनाथमध्ये चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले title=

अंबरनाथ : नगरपरिषदेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. वॉर्ड क्रमांक ३९मध्ये  चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले आहे. या वॉर्डात  दोन्ही अपक्ष उमेदावाराने जोरदार टक्कर दिली. अपक्ष उमेदवारांना समसमान मते पडलीत. 

वॉर्ड क्रमांक ३९ मध्ये शांताबाई पाटील आणि सारिका सिंघवे यांना ४६९ अशी समसमान मते मिळालीत. त्यामुळे पेच निर्माण झाला. निकालासाठी चिठ्ठीचा आधार घेण्यात आला. यावेळी चिठ्ठीद्वारे शांताबाई पाटील विजयी झाल्याचे घोषीत करण्यात आले.

दरम्यान, नगरपरिषदेमध्ये भाजपची एक जागा होती ती यावेळी १० जागांवर भाजपचे उमेदवार निवडणून आले. तर काँग्रेसच्या ५ जागा वाढल्या आणि राष्ट्रवादीच्या जागा ४ जागा कमी झाल्या  आहेत. तर मनसेच्या ६ जागा होत्या त्या जागाही मनसे राखून ठेवेल का असा परिस्थती निर्माण झाली आहे. शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत पण वरीष्ठ पातळीवर चर्चा झाली तर पाचव्यांदा शिवसेनेचा नगराध्यक्ष अंबरनाथ नगरपरिषदेवर येईल, असे दिसत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.