farmers protest

निवडणूक की आंदोलन? सुकाणू समितीच्या नेत्यांमध्येच मतभेद

 राज्य सरकारनं शनिवारी शेतक-यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर शेतकरी आंदोनलकर्त्यांच्या सुकाणू समितीची मुंबईत रविवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर सुकाणू समितीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सुकाणू समितीतल्या नेत्यांचे मतभेद समोर आले.

Jun 26, 2017, 10:27 AM IST

शेतकरी आंदोलन : बंदच्या काळात लूट-जाळपोळ, रस्ता-रेल्वे वाहतुकीवर परिणाम

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याने शेतकरी अधिक आक्रमक झालेत. बंदच्या काळात लुटीच्या घटनांत वाढ झालेय. तसेच आंदोलनामुळे रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय.

Jun 8, 2017, 10:07 AM IST

शेतकरी संपाला राजू शेट्टींचा पाठिंबा, उद्या महाराष्ट्र बंद

शेतकरी संपात फूट पडली असली तरी काही शेतकऱ्यांना संप आज चौथ्या दिवशी सुरुच आहे. ५ जूनच्या महाराष्ट्र बंदला आमचा  पाठिंबा असून आम्ही संपात सहभागी होणार असे सांगून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेय, असा थेट आरोप खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.

Jun 4, 2017, 06:19 PM IST

कालव्यांचं अपूर्ण काम पूर्ण कराण्याच्या मागणीसाठी शेतक-यांचा मोर्चा

निळवंडे धरणातल्या कालव्यांचं अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी, शेतक-यांनी अहमदनगरमध्ये मोर्चा काढला. उत्तर अहमदनगर जिल्ह्यासह दुष्काळी भागाला निळवंडे धरण वरदान ठरलंय. मात्र या कालव्यांचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मागल्या तीन वर्षांत, सरकारनं अतिशय तुटपुंजा निधी दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Apr 23, 2017, 02:38 PM IST

विद्यापीठासाठी दिलेल्या जागा परत देण्याची शेतकऱ्याची मागणी

विद्यापीठासाठी दिलेल्या जागा परत देण्याची शेतकऱ्याची मागणी

May 3, 2016, 09:34 PM IST