gst

जीएसटीचं काऊंटडाऊन सुरू... आज मध्यरात्री भव्य लॉन्चिंग सोहळा

जीएसटीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. आज मध्यरात्री देशातली सर्वात मोठी आर्थिक सुधारणा लागू होईल. देशात वस्तू आणि सेवाकर लागू होणार आहे. या ऐतिहासिक क्षणी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशातल्या १०० नामदारांना बोलवण्यात आलंय. 

Jun 30, 2017, 09:19 AM IST

जीएसटी : पाहा कोणत्या वस्तूंवर किती टॅक्स

जीएसटी लागू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसह जीएसटीचं लॉन्चिग करण्यात येणार आहे. जीएसटीमध्ये वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळ्या स्लॅबमध्ये टॅक्स लावण्यात येणार आहे.

Jun 29, 2017, 04:47 PM IST

जीएसटी : पाहा कोणत्या सेवांवर किती टक्के टॅक्स

जीएसटी काउंसिलने वेगवेगळ्या सर्व्हिसेसवर 4 वेगवेगळ्या  स्लॅबमध्ये टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि आरोग्य यावर नवीन कर प्रणालीत कोणताही टॅक्स नाही लागणार आहे. तर काही सेवा स्वस्त तर काही महाग होणार आहेत. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे वेगवेगळे स्लॅब असणार आहे.

Jun 29, 2017, 03:07 PM IST

जीएसटी : पाहा कोणत्या गोष्टी झाल्या स्वस्त

जीएसटी काउंसिलने सर्व्हिसेसवर 4 वेगवेगळ्या टॅक्स स्लॅब लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण आणि आरोग्य यावर नवीन कर प्रणालीत कोणताही टॅक्स नाही लागणार. तर काही सेवा स्वस्त होतील तर काही महाग. दूरसंचार, विमा, हॉटेल आणि रेस्टॉरंटसह विविध सेवांसाठी 4 वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स स्लॅब बनवले आहेत. ते 5, 12, 18 आणि 28 टक्के असे असणार आहे. जीएसटी 1 जुलैपासून लागू होणार आहे.

Jun 29, 2017, 02:12 PM IST

जीएसटी भरण्यास विलंब करणा-या व्यापा-यांना भरमसाठ दंडाची तरतूद

जीएसटी करप्रणाली लागू करण्यासाठी अत्यावश्यक असणारे अधिनियम सरकारनं काल रात्री जारी केले आहेत. या अधिनियमानुसार जर एखाद्या उत्पादकानं, सेवा पुरवणाऱ्यानं किंवा व्यापाऱ्यानं जीएसटीचा भरणा करण्यास विलंब केला, तर त्याला मूळ कराच्या रक्कमेवर 18 टक्के दरानं व्याज द्यावं लागणार आहे.

Jun 29, 2017, 12:13 PM IST

GSTच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घालण्याच्या तयारीत

३० तारखेला GST लागू करण्यासाठी संसदभवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमावर काही प्रमुख विरोधी पक्ष बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.

Jun 28, 2017, 10:04 PM IST

जीएसटीमुळे प्रिपेड आणि पोस्टपेड बिलात होणार वाढ

येत्या १ जुलैपासून जीएसटी लागू होत असल्यामुळे मोबाईल प्रिपेड आणि पोस्टपेड बिलामध्येही बदल होणार आहेत.

Jun 28, 2017, 04:43 PM IST

सोने खरेदीसाठी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड

सोने खरेदीवर जीएसटी लागू होण्याआधी सराफा दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. सोनं खरेदीवर तीन टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळं जीएसटीचा भार ग्राहकांवर पडणार आहे.

Jun 28, 2017, 03:59 PM IST

काय आहेत जीएसटी करप्रणालीचे फायदे, पाहा...

काय आहेत जीएसटी करप्रणालीचे फायदे, पाहा... 

Jun 28, 2017, 03:51 PM IST