heart of asia conference

भारत-अफगाणिस्तान संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात

हार्ट ऑफ एशिया परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांच्या हस्ते रविवारी उदघाटन झालं. यावेळी दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी केवळ चर्चा करुन उपयोग नाही. तर त्यावर कठोर कारवाई कऱण्याची गरज असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे दहशतवादाशी सामना करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. तर घानी यांनी पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचं म्हणत पाकिस्तानवर जोरदार टीका केली. हार्ट ऑफ एशियाच्या माध्यमातून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे.

Dec 5, 2016, 08:24 AM IST

दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या आणि आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात : मोदी

आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात नसून दहशतवादाला सहाय्य करणाऱ्या, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात आहोत, असे ठणकावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Dec 4, 2016, 12:51 PM IST