jdu

बिहारमध्ये लालू-नितीशचं कमबॅक... मोदी लाट ओसरली?

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होऊन घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपची बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत पीछेहाट झाल्याचं चित्र दिसतंय. दहा पैकी चार जागांचे निकाल लागले असून यात आरजेडीनं दोन जागांवर तर भाजपनं दोन जागांवर विजय मिळवलाय. 

Aug 25, 2014, 12:48 PM IST

“चीनमध्ये ‘सेक्स’साठी बंधनं नाहीत म्हणून…”

चीनमध्ये तरुणांची सेक्सची मागणी पूर्ण करण्यासाठी कुठलीही बंधनं नाहीत. म्हणूनच तिथं अत्याचार होत नाहीत, अशी मुक्ताफळं उधळलीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी... यादव इथंच थांबले नाहीत तर भारतात संस्कृती, धर्माच्या नावाखाली सभ्यतेला अक्षरश: पोखरून काढलयं. 

Aug 10, 2014, 11:48 AM IST

असीमानंद यांच्या आरोपांची चौकशी करा - काँग्रेस, बसपा, जेडीयू

असीमानंद यांच्या आरोपानंतर काँग्रेस, बसपा आणि जेडीयू या तीन्ही पक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना लक्ष्य केलंय. या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय.

Feb 6, 2014, 06:23 PM IST

बिहारमध्ये नितीशकुमारांना काँग्रेसने तारले

बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घेतला खरा. मात्र, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेसने साथ दिल्याने नितीशकुमार यांनी सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला.

Jun 19, 2013, 10:00 PM IST

नीतिशकुमार म्हणजे आडवाणींचे पोपट- लालू प्रसाद

नितीश कुमार हे अडवाणींच्या इशा-यावर चालणारे पोपट असल्याची टीका लालू प्रसाद यादवांनी केली आहे. त्यांना स्वतःचा विचार नसल्याचंही लालू प्रसाद यादव म्हणाले.

Jun 12, 2013, 06:59 PM IST

मोदींमुळे जेडीयु आणि भाजपमध्ये संघर्ष!

जेडीयु आणि भाजप गेल्या सोळा वर्षांपासून एकत्र नांदतायत. दोघांनीही लोकसभेच्या चार निवडणुका एकत्र लढवल्यायत. दोन वेळा केंद्र सरकारमध्येही दोन्ही पक्ष एकत्र होते.

Apr 15, 2013, 06:30 PM IST

संगमांचं जेडीयू-सेनेला पाठिंब्यासाठी आवाहन...

आज दुपारी भाजपनं पी. संगमा यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपनं जाहिर केलेल्या पाठिंब्यामुळे पी. संगमा यांचा आत्मविश्वासही दुणावलाय. भाजपनंतर आता जेडीयू आणि शिवसेनेलाही समर्थनासाठी गळ घातलीय.

Jun 21, 2012, 07:03 PM IST