काही क्षणात होत्याच नव्हतं झालं! सुंदर गाव 'असं' गेलं जमिनीच्या पोटात; 2000 हून अधिक लोक जिवंत गाडले गेले

Papua New Guinea Landslide:  या घटनेत इमारती, अन्न बागांचे मोठे नुकसान झाले आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला.

Pravin Dabholkar | Updated: May 27, 2024, 03:52 PM IST
काही क्षणात होत्याच नव्हतं झालं! सुंदर गाव 'असं' गेलं जमिनीच्या पोटात; 2000 हून अधिक लोक जिवंत गाडले गेले title=
papua new guinea landslide

Papua New Guinea Landslide:  पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन होऊन 2 हजारहून अधिकजण जमिनीखाली गाडले गेले आहेत. देशाच्या उत्तरेकडील एका दुर्गम गावात भूस्खलन झाले असून यात 2,000 हून अधिक लोक गाडले गेल्याची माहिती पापुआ न्यू गिनी राष्ट्रीय आपत्ती केंद्राने दिली.  या घटनेत इमारती, अन्न बागांचे मोठे नुकसान झाले आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. राष्ट्रीय आपत्ती केंद्राच्या एका अधिकाऱ्याने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे.

पापुआ न्यू गिनीमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यामध्ये ढिगाऱ्यातून अनेकांचे जीव वाचवण्यात आले.  आपत्कालिन पथक येथे अथिशय वेगाने काम करत असून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या आपत्तीतील मृतांचा आकडा पाचपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अनेक इमारती झाल्या जमीनदोस्त 

प्रांतातील मुलितका भागात भूस्खलनामुळे सहाहून अधिक गावे बाधित झाल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभागाने दिली. या घटनेत 100 हून अधिक घरे, एक प्राथमिक शाळा, छोटे व्यवसाय आणि स्टॉल्स, एक गेस्ट हाऊस आणि एक पेट्रोल स्टेशन जमीनदोस्त झाले, असे यूएन मायग्रेशन एजन्सी आयओएमने म्हटले आहे.