mars

मंगळावर काच सापडल्याने जीवसृष्टीची शक्‍यता वाढली

नासाने  मंगळवारी मंगळ ग्रहावर काच सापडली असल्याचं म्हटलं आहे, यामुळे मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे. मंगळाच्या कक्षेत फिरून मंगळाचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या अवकाशयानाला काचेचा संचय सापडला असल्याचे नासाने म्हटलंय, त्यामुळे तेथे पूर्वी जीवसृष्टीची शक्‍यता व्यक्त करण्यास बळ मिळालंय.

Jun 10, 2015, 05:53 PM IST

मंगळयान मिशन: पुढील १५ दिवसाकरता मंगळयानशी संपर्क तूटणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोचा मंगळ ग्रहाभोवती फिरणाऱ्या मंगळयानशी संपर्क तूटणार असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. उद्यापासून म्हणजेच ८ जून ते २२ जून या पंधरा दिवसांकरता मंगळयानाशी संपर्क तूटणार आहे. 

Jun 7, 2015, 01:38 PM IST

मंगळावर जाणार ३ भारतीय, १०० जणांच्या यादीत निवड

मंगळावर जाणार ३ भारतीय, १०० जणांच्या यादीत निवड

Feb 18, 2015, 10:14 AM IST

मंगळावर जाणार ३ भारतीय, १०० जणांच्या यादीत निवड

मंगळावर वसाहत करण्यासाठी उपांत्य फेरीत १०० लोकांची निवड करण्यात आली असून या साहसी नागरिकांत ३ जण भारतीय आहेत. त्यात दोन महिला असून एक पुरुष आहे. २०२४ मध्ये यातील पहिले चारजण मंगळावर जातील. मंगळावर जाणारी ही खाजगी सहल असून, त्याअंतर्गत एकदाच मंगळावर जाण्याची सोय आहे.

Feb 17, 2015, 08:56 AM IST

मंगळावर १९७९मध्ये माणसाचा वावर, नासाच्या माजी कर्मचाऱ्याचा दावा

मंगळावर १९७९मध्ये दोन व्यक्ती पाहिल्याचा दावा  राष्ट्रीय वैमानिक आणि अंतराळ प्रशासनच्या (नासा) एका माजी कर्मचाऱ्यांने केला आहे. त्याने हा दावा  विकिंग मार्स लेंडर या उपग्रहाने पाठविलेल्या छायाचित्रावरुन केला आहे.

Nov 28, 2014, 05:52 PM IST

मंगळावर पाठवा तुमचं नाव...

मंगळावर आणि आपलं नाव? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?? पण... खरोखरच हे शक्य आहे... नासानं ही संधी उपलब्ध करून दिलीय. 

Oct 9, 2014, 05:02 PM IST

मंगळयानाने पाठवला मंगळाचा आणखी एक फोटो

मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केलेल्या भारतीय मंगळयानाने मंगळ ग्रहाचा एक आणखी सुंदर फोटो पाठवला आहे. हा फोटो इस्रोने प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये आपल्याला सूर्यमालेतील चौथा ग्रह मंगळ दिसत आहे. लाल ग्रहाच्या या फोटोमध्ये ग्रहाचे उंचवटे आणि पठार स्पष्ट दिसत आहेत. 

Oct 8, 2014, 06:51 PM IST

मंगळयान मोहीम फत्ते, इस्त्रोचा ऐतिहासिक दिवस

मंगळयान आज 24 सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. मंगळयानाच्या मुख्य लिक्विड इंजिनाची चाचणी यशस्वी झाली आणि आज सकाळी ७.२१ मिनिटांनी मंगळयान मंगळग्रहावर पोहोचले. अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सुवर्ण अक्षरात नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी केली. सकाळी ७.४५ वाजता सुमारास मंगळयानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला आणि मंगळ मोहीम फत्ते झाली. यामुळे इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. हे भारताचे मोठे यश आहे. जगातील मोजक्यात देशांमध्ये पंक्तित भारत जाऊन बसला आहे.

Sep 24, 2014, 07:25 AM IST

अंतराळात इतिहास रचणार भारत, ‘मार्स मिशन’चं महत्त्वाचं टेस्टिंग आज

येत्या २४ सप्टेंबर रोजी भारताच्या मंगळ यानानं लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ‘इस्रो’ सोमवारी अतिशय महत्त्वपूर्ण अशा ‘चौथ्या पथ संशोधन कार्य’ आणि अंतराळ यानाच्या प्रमुख द्रवित इंजिनची प्रायोगिक चाचणी घेण्यासाठी सज्ज आहे.

Sep 22, 2014, 11:57 AM IST

मंगळावर सर्वप्रथम वसाहत पृथ्वीवरील जिवाणूंची

मंगळावर जाण्याची स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मंगळवार पाय ठेवतांनाही विचार करावा लागणार आहे. कारण मंगळावर पृथ्वीवरील जिवाणुंची सर्वप्रथम वसाहत असण्याची शक्यता आहे.

May 5, 2014, 02:09 PM IST

मंगळावर पाणी... हा घ्या पुरावा!

मंगळ... याच लालग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात होतं... याचे धडधडीत पुरावेच आता नासाच्या हाती लागले आहेत. याच ग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी जीवसृष्टीही अस्तित्वात होती, असा नासाचा कयास आहे.

Jan 25, 2014, 06:35 PM IST

‘मंगळ’वारीसाठी ६२ भारतीयांची निवड

मंगळ ग्रहावर एक कायमची कॉलनी वसविण्याच्या २०२४च्या एका खासगी महत्वाकांक्षी योजनेसाठी जगभरातून १००० व्यक्तींपेक्षा अधिकांची निवड करण्यात आली. या यादीत ६२ भारतीयांचा समावेश आहे.

Jan 3, 2014, 04:20 PM IST

भारताचे यान मध्यरात्रीनंतर मंगळ ग्रहाच्या कक्षेत

भारताचे मंगळयान आज शनिवारी मध्यरात्रीनंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि मंगळ ग्रहाच्या दिशेने आपल्या प्रवासाला प्रारंभ करेल. हे मंगळयाळ २५ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिले.

Nov 30, 2013, 12:59 PM IST