बंगळुरू: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोचा मंगळ ग्रहाभोवती फिरणाऱ्या मंगळयानशी संपर्क तूटणार असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. उद्यापासून म्हणजेच ८ जून ते २२ जून या पंधरा दिवसांकरता मंगळयानाशी संपर्क तूटणार आहे.
मंगळ - सूर्य - पृथ्वी एका रेषेत येणार आहेत म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर पृथ्वीवरुन मंगळ ग्रहाकडे बघतांना सूर्य हा मधे येणार आहे. या पंधरा दिवसांकरता शास्त्रज्ञ मंगळयानाला auto मोडवर टाकणार आहेत.
२४ सप्टेंबर २०१४ पासून मंगळ भोवती फिरणाऱ्या मंगळयानाचं आयुष्य नियोजन केल्याप्रमाणे सहा महिन्यांचे म्हणजे मार्चपर्यंतच होते. मात्र मंगळयानामध्ये अजूनही इंधन शिल्लक असल्यानं त्याचं आयुष्य वाढलं असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.