mazya navryachi bayko

टीआरपीमध्ये 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेला सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. गुरुनाथ सुभेदार आणि शनाया यांना दूर करण्यासाठी राधिका सुभेदार लढवत असलेल्या विविध शक्कल यांमुळे या मालिकेचा टीआरपी सर्वाधिक आहे. 

Dec 2, 2016, 03:34 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाच्या नात्यात एकमेकांची सुख दु:खे वाटून घेतली की ते नातं अधिक घट्ट होतं असं म्हणतात आणि हे नातं नवरा बायकोच असेल तर नात्यांची ही वीण अधिकच मजबूत होते. पण या नात्यात सुख दुखासोबत ते प्रेमच वाटून घेणारा एखादा वाटेकरी आला तर मग हीच वीण सैल होण्याचीही शक्यता असते. मग ही वीण घट्ट करण्यासाठी कधी कधी गाठ जरा जास्तच आवळून बांधावी लागते आणि कधी कधी संसार गोड होण्यासाठी थोडं तिखटही व्हावंच लागतं. याच कथासुत्रावर आधारीत झी मराठीची नवी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. 

Aug 19, 2016, 01:00 PM IST