उंदीर, साप, चिमणी आणि आता बेडूक... प्राणी संग्रहालयात नाही तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारात सापडतात हे प्राणी
अ अननसाचा... ब बदकाचा... शाळेत हे असंच शिकवलं जातं. मात्र पोषण आहाराचे कंत्राटदार आहेत की या मुलांना काही वेगळेच धडे देत आहेत. पोषण आहाराचे कंत्राटदार म्हणतायत ब बेडकाचा... च चिमणीचा... उ उंदराचा.... स सापाचा... पाठ्यपुस्तकांमधून हे धडे मिळत नाहीएत तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना हे धडे मिळतायत.. कारण कधी पोषण आहारात मेलेला उंदीर मिळतो.. कधी याच पोषण आहारात साप मिळतो. तर कधी मेलेली चिमणी.
Jul 13, 2024, 11:47 PM IST