nalini singh

पत्नी सुनंदाच्या मृत्यूबाबत शशी थरूर यांनी नोंदवला जबाब

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी गूढ कायमच आहे. याप्रकरणी सुनंदा यांचे पती आणि केंद्रीय मंत्री शशी थरुर यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. संध्याकाळच्या सुमारास थरुर एसडीएम ऑफिसमध्ये पोहचले. यावेळी एसडीएमनं सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी थरुर यांचा जबाब नोंदवून घेतला.

Jan 20, 2014, 08:04 AM IST

मृत्यूचं गूढ: मृत्यूपूर्वी सुनंदा आणि शशी थरूरमध्ये झालं होतं भांडण

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. नवनवे खुलासे समोर येतायेत. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा धक्कादायक खुलासा डॉक्टरांनी पोस्ट मॉर्टमनंतर केलेला असतानाच, या प्रकरणाचा गुंता आणखी वाढवणारी आणि भुवया उंचावणारी माहिती समोर आलीय. काही दिवसांपूर्वीच, थरूर आणि सुनंदा यांच्यात १५ जानेवारीला विमानातच जोरदार भांडण झाल्याचं समोर आलंय.

Jan 19, 2014, 12:42 PM IST

मृत्यूपूर्वी काय सांगितलं सुनंदा पुष्कर यांनी नलिनी सिंग यांना?

केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यू पूर्वी त्यांनी पत्रकार आणि सुनंदा यांची मैत्रिण असलेल्या नलिनी सिंग यांना फोन केला असल्याचं स्पष्ट झालंय. नलिनी सिंग यांनी याबाबत माहिती दिलीय.

Jan 19, 2014, 10:29 AM IST