nitish kumar

मोदींमुळे जेडीयु आणि भाजपमध्ये संघर्ष!

जेडीयु आणि भाजप गेल्या सोळा वर्षांपासून एकत्र नांदतायत. दोघांनीही लोकसभेच्या चार निवडणुका एकत्र लढवल्यायत. दोन वेळा केंद्र सरकारमध्येही दोन्ही पक्ष एकत्र होते.

Apr 15, 2013, 06:30 PM IST

नीतिश कुमारांचा मोदी विरोध कायम!

नितीश कुमार यांनी मात्र मोदींना विरोध मावळला नसल्याचेच संकेत दिले आहेत. भाजपला गर्भित इशारा देताना नितीश कुमारांनी युतीच्या मुलभूत रचनेतला बदल खपवून घेतला जाणार नाही असं म्हटलंय.

Apr 14, 2013, 09:54 PM IST

मोदींसाठी मुंडेंची `बॅटिंग`?

नितीश कुमार यांचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास विरोध नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.

Apr 14, 2013, 05:14 PM IST

बिहारला मिळणार विशेष राज्याचा दर्जा!

बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी नितीशकुमारांचे सुरु असलेले प्रयत्न लवकरच फळाला येण्याची शक्यता आहे. मागास राज्याचा दर्जा ठरवण्याबाबतचे निकष नव्यानं निश्चित करण्याचे संकेत केंद्र सरकारनं दिलेत. येत्या दोन महिन्यात याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

Mar 26, 2013, 12:56 PM IST

नीतीश कुमार X नरेंद्र मोदी

2014च्या निवडणुकांपूर्वी नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं युद्ध तेजीत आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. सांप्रदायिकतेनंतर आता विकासाच्या मुद्द्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे.

Mar 17, 2013, 11:23 PM IST

बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या - नितीश

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जोरदार शक्ति प्रदर्शन केलं. यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस पक्ष राज्याबाबत राजकारण करीत आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नितीश कुमार यांनी केली.

Mar 17, 2013, 01:56 PM IST

युपीएला धोका नाही- नीतिश कुमार

केंद्रातल्या य़ुपीए सरकारला धोका नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी म्हटलंय. भाजपनं केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना नीतिश कुमारांनी वक्तव्य करुन भाजपच्या दाव्यातली हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय.

Sep 17, 2012, 04:12 PM IST

नितीश स्तुतीवरून `मोहन` वादळ

गुजरातच्या मोदी सरकारपेक्षा बिहारमधील नितीशकुमार यांचं सरकार उत्तम असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलयं. त्यांच्या या वक्तव्यामुळं संघ परिवारात एकच वादळ निर्माण झालयं.

Aug 11, 2012, 02:22 PM IST

संघाकडून नीतिश राजची प्रशंसा, अडचणीत मोदी

आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारांवरून एनडीएमध्ये खडाजंगी थांबण्याचे नाव घेतल नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणून त्यांची स्तुती करणारा संघ परिवार आता बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे गोडवे गात आहे.

Aug 10, 2012, 03:12 PM IST

नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे नाही- नितीशकुमार

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाबद्दल आतापासूनच वादविवादाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी आणि नितीश कुमार यांची २५ जुलैला एक गुप्त बैठक झाली.

Aug 5, 2012, 01:12 PM IST

नीतिश कुमारांच्या जनता दरबारात काडतुसे!

बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमारांच्या 'जनता दरबारात' पोलिसांनी एकाला सहा जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले. हितेश असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Jul 9, 2012, 06:10 PM IST

बिहार दिनाचा तिढा सुटणार? आयोजक राज भेटीला

बिहार दिनाचे बिहार दिनाचे आयोजक राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत. देवेश ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या भेटीत बिहार दिनाबाबतचा वाद संपण्याची विनंती देवेश ठाकूर राज ठाकरेंना करण्याची शक्यता आहे.

Apr 14, 2012, 08:30 AM IST

राज ठाकरेंचा बिहार दिनाला 'ग्रीन सिग्नल'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बिहार दिनाचे आयोजक देवेश ठाकूर यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर बिहाराचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यानंतर राज यांनी बिहार दिनाला हिरवा कंदील दाखवला. बिहार दिन हा राजकीय कार्यक्रम नसल्याने तो सांस्कृतिक आहे. त्यामुळे आपली काही हरकत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.

Apr 13, 2012, 04:24 PM IST

बिहार दिनाला मी मुंबईत जाणारच - नीतिश

बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देताना बिहार दिनाचे मला निमंत्रण दिले गेले आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने मुंबईत जाणार आहे, असे जाहीर केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा वाद नीतिश कुमार यांनीच निर्माण केला आ

Apr 13, 2012, 02:29 PM IST

बिहार दिन : राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर बैठक

मुंबईत बिहार दिन साजरा केला जाईल. आम्हाला कोणीही अडवून शकत नाही, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी केले होते. त्यानंतर मालेगावात तुम्ही मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवाच, असा इशारा ठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. आज मुंबईत 15 एप्रिल रोजी मुंबईत साजरा करण्यात येणाऱ्या बिहारदिनाबाबत भूमिका ठरविण्यासाठी कृष्णकुंजवर मनसे आमदारांची तातडीची बैठक बोलाविली.

Apr 13, 2012, 01:00 PM IST