rahul gandhi

राहुल गांधी रेल्वेने पंजाब दौऱ्यावर

पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंजाब राज्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे रेल्वेगाडीमधून पंजाबला जात आहेत. 

Apr 28, 2015, 06:02 PM IST

'आप' रॅली : शेतकरी आत्महत्येवरुन राजकारण पेटले

'आप'च्या रॅलीत शेतक-यानं केलेल्या आत्महत्येवरून आता राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने यानिमित्तानं भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजपने मानवतेची हत्या झाल्याचे म्हटले आहे.

Apr 22, 2015, 08:57 PM IST

राहुल गांधींच्या भाषणानंतर "नेट न्युट्रॅलिटी' ट्रेंड

 तरूणांसाठी महत्वाचा विषय असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीवर राहुल गांधी यांनी संसदेत आवाज उठवला आहे. लोकसभेत "'नेट न्युट्रॅलिटी' या विषयावर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला, यानंतर "#RGforNetNeutrality‘ या हॅशटॅगद्वारे ट्विटरवर ट्रेंड आला आहे.

Apr 22, 2015, 04:42 PM IST

'नेट न्यूट्रॅलिटी'वर राहुलची बॅटींग

इंटरनेट निरपेक्षता अर्थात नेट न्यूट्रॅलिटीवर आज पुन्हा एकदा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार बॅटींग केलीय. नेट निरपेक्षता सुनिश्चत करण्यासाठी कायद्यात बदल किंवा नव्या कायद्याची मागणी राहुल गांधी यांनी केलीय. इंटरनेट बड्या बड्या उद्योगपतींच्या हातात सोपवण्यासाठी सरकारचा हा डाव असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केलाय. 

Apr 22, 2015, 03:21 PM IST

"फक्त गडकरीच खरे बोलतात", राहुल गांधींचा टोला

 कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोमवारी टोमणा मारलाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या मुद्द्यावरून लोकसभेतील चर्चेत सहभागी होताना, केंद्र सरकारमध्ये केवळ नितीन गडकरीच खरे बोलतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

Apr 20, 2015, 06:07 PM IST

'हे सरकार व्यापाऱ्यांचं, सुटा-बुटातल्या लोकांचं'

केंद्रातील भाजप सरकारी हे उद्योजक व्यापाऱ्यांचं आहे. हे सुटा-बुटातल्या लोकांसाठीचं सरकार आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत बोलतांना केली आहे.

Apr 20, 2015, 05:30 PM IST