चंद्रपूरमध्ये पावसाचे संकट, ४ बळी
चंद्रपुरात मुसळधार पावसाचे चार बळी गेलेत. दिवसभर सुरु असलेल्या पावसाचा फटका औष्णिक विद्युत केंद्रालाही बसला असून या केंद्रात सर्वत्र पाणी शिरल्यानं वीज निर्मिती ठप्प झालीय. इतिहासात पहिल्यांदात वीज निर्मिती बंद होण्याची घटना घडलीय. तर मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
Jul 20, 2013, 10:22 AM ISTधरणं उघडली, रस्ते पाण्यात, संपर्क तुटला!
गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने विदर्भात सर्वत्र धुमाकूळ घातलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.
Jul 17, 2013, 02:16 PM ISTनागपूर, विदर्भात पूरपरिस्थिती
नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळसह संपूर्ण विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुरामुळं अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली असून, पिकंही धोक्यात आलीय.
Jul 17, 2013, 09:51 AM ISTमुंबईत पावसाचे दोन बळी, दोन बेपत्ता
मुंबईत मुसळधार पावसामुळे आतापर्यंत दोन जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. तर दोन जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. मुलुंड मानखुर्द नाला येथे एक तर कांदिवली ठाकुर्ली व्हिलेज येथे एक जणाने प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 12, 2013, 04:57 PM ISTपावसाचा धिंगाणा, लोकल लेट तर काही रद्द
मुसळधार पावसाने मुंबईकरांना सळो की पळो करून सोडलेय. अनेक ठिकणी पाणी साचल्याने मुंबईतील बेस्ट वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेत. त्यामुळे मध्य रेल्वेची स्लो वाहतूक बंद झालेय. तर दादर, हिंदमाता, एलफिस्टन(वेस्ट) , सायन रोड २४, भांडूप (वेस्ट) या भागांत पाणी साचल्याने रस्ता वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
Jul 12, 2013, 03:03 PM ISTराज्यात संततधार, कोकण-कोल्हापुरात पूर
राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Jul 12, 2013, 11:41 AM ISTमुंबईसह राज्यात संततधार, रेल्वेवर परिणाम
मुंबईसह राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. संततधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक धिम्मा गतीने सुरू आहे. ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस असून ठाण्यात रूळावर पाणी साचल्याने गाड्या सुटण्यास १५ मिनिटे उशीर होत आहे. तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस गाड्यांनाही उशीर झालाय. तर राज्यात कोकण, कोल्हापुरात नद्यांना पूर आलाय.
Jul 12, 2013, 11:17 AM ISTविकेन्ड डेस्टीनेशन : आषाणे धबधबा
सध्या मुंबईत मस्त पाऊस पडतोय. या पावसाळ्यात भटकण्यासाठी एका छान पर्यटनस्थळाची ओळख करुन देणार आहोत. हा आहे भिवपुरीचा आषाणे धबधबा...
Jul 9, 2013, 07:41 PM ISTराज्यात पाऊस, मराठवाडा कोरडा!
राज्यात जून महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झालाय. मात्र, मराठवाड्यातल्या एकूण प्रकल्पात फक्त 6 टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे जायकवाडी, येलदरी, मांजरा, सिद्धेश्वर, माजलगाव आणि निम्न तेरणा आदी धरणांत शून्य टक्के पाणीसाठा आहे.
Jul 3, 2013, 08:54 PM ISTकोकणात पूरस्थिती, विद्यार्थी गेला वाहून
कोकणात जोरदार वृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेय. तर पोलादपूर येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थी वाहून गेला.
Jul 3, 2013, 04:10 PM ISTकोकणात मुसळधार, रेल्वे-रस्ता वाहतुकीवर परिणाम
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा रस्ता वाहतूक आणि कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दरड कोसळ्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेय.
Jul 3, 2013, 08:30 AM ISTसंपूर्ण विदर्भात पावसाची दमदार हजेरी
नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसानं कालपासून दमदार हजेरी लावलीय. नागपुरात रात्रभरात 72 मिमी पावसाची नोंद झालीय. भंडारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून संततधार सुरू आहे.
Jun 25, 2013, 10:54 PM ISTमृत पतीजवळ बसावे लागले दोन दिवस
गाळात अडकलेल्या पतीच्या मृतदेहाजवळ तब्बल दोन दिवस बसून राहण्याची वेळ उत्तरप्रदेशातील रहिवासी सविता नागपाल यांच्यावर आली.
Jun 20, 2013, 05:46 PM ISTराजधानी दिल्लीत पुराचा धोका
उत्तराखंडमध्ये पुरानं थैमान घातलं असतानाच राजधानी दिल्लीलाही पुराचा धोका निर्माण झालाय. यमुना नदीचा प्रवाह पूरपातळीपेक्षा २ मीटर जास्त आहे.
Jun 19, 2013, 08:51 PM ISTमुंबईत पावसाचा ५२ वर्षांचा रेकॉर्ड मोडीत
पहिल्याच पावसानं मुंबईला चक्काजाम करून दणका दिला असला, तरी हाच पाऊस एक गुड न्यूजही घेऊन आलाय. यंदा मुंबई महापालिकेच्या सर्व धरणांची पातळी वेळेपेक्षा आधीच चांगली झालीये. १८ जूनच्या आकडेवारीनुसार गेल्या ४ वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या लवकर मुंबईची सर्व धरणं सर्वाधिक भरलीयत.
Jun 19, 2013, 08:32 PM IST