students

शिक्षकांनी शिक्षा केल्याने तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

शिक्षकांनी शिक्षा केल्याने विरारमधील तीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या मागे असलेल्या नदीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी बेपत्ता होते. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे. 

Aug 27, 2014, 01:15 PM IST

मोबाईल चालताना चार्ज करा, भारतीय चिमुड्यांना यश

दिल्लीमधील दोन शाळकरी मुलांनी लाखो लोकांच्या मोबाईल फोनची बॅटरी डिस्चार्ज होण्याची समस्या दूर केली आहे. पायातील चालण्याची ताकत आणि शूजमध्ये छोटीशी बॅटरी असेल तर तुम्ही कोणत्याही कनेक्शनशिवाय कधीही मोबाईल फोन चार्ज करू शकता. चला तर पाहूया कसा होतो चालता फिरता मोबाईल चार्ज.

Aug 21, 2014, 06:15 PM IST

सावंतवाडीतल्या कळसूलकर हायस्कूलची दूरवस्था

 सावंतवाडीतल्या कळसूलकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी आज बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पायाभूत सुविधाही पुरवल्या जात नसून याला सर्वस्वी शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. मुलांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तसंच शाळेच्या इमारतीचीही दूरवस्था झालीय. इमारत कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

Aug 15, 2014, 10:20 PM IST

एक महाविद्यालय : दोन प्राचार्य, विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा

एक महाविद्यालय आणि दोन प्राचार्य असा शिक्षणाचा खेळखंडोबा सध्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये सुरू आहे. संस्थेवर कब्जा करण्याच्या राजकारणात आपण विद्यार्थ्यांचं नुकसान करतोय, याची साधी जाणीव नेत्यांना नाही. नक्की काय आहे हे प्रकरण?

Aug 7, 2014, 09:19 AM IST

जर्मनीतील कार रेसिंग स्पर्धेत पनवेलचे विद्यार्थी

 जर्मनीत २९ जुलै ४ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या कार रेसिंगच्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व नवीन पनवेलमधील पिल्लई कॉलेजचे विद्यार्थी करणार आहेत. 

Jul 22, 2014, 08:39 PM IST