नवी दिल्ली : दिल्लीमधील दोन शाळकरी मुलांनी लाखो लोकांच्या मोबाईल फोनची बॅटरी डिस्चार्ज होण्याची समस्या दूर केली आहे. पायातील चालण्याची ताकत आणि शूजमध्ये छोटीशी बॅटरी असेल तर तुम्ही कोणत्याही कनेक्शनशिवाय कधीही मोबाईल फोन चार्ज करू शकता. चला तर पाहूया कसा होतो चालता फिरता मोबाईल चार्ज.
हे छोटंसं मॉडेल तुम्हा सर्वांना दिलासा देणारी बातमी घेऊन आलं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल चार्ज करण्याचं टेन्शन राहणार नाही.कारण आपण या मॉडेलच्या मदतीने कधीही, कुठेही आपला मोबाईल चार्ज करू शकता आणि तेही इलेक्ट्रिसिटीच्या कोणत्याही मदतीविना.
स्वत:चा मोबाईल चार्ज करण्याकरता तुम्हाला बस थोडं चालावं लागेल इतकंच. येथे तुम्ही चालायला सुरूवात केली की लगेच तुमचा मोबाईल चार्ज व्हायला सुरूवात होईल. आपण विचार करत असाल की हा शोध या शाळकरी मुलांच्या हातात काय करतोय? तर या चालत्या फिरत्या मोबाईल चार्जरचा शोध या मुलांनीच लावला आहे.
एक डायनामो, एक रिचार्जेबल बॅटरी आणि धातूचे काही तुकडे यांच्या मदतीने तयार झाला मोबाईल चार्जर. याला शूजमध्ये फिट करून आपण चालायला लागलात की आपल्या एनर्जीने बॅटरी चार्ज व्हायला लागेल आणि त्या बॅटरीने मोबाईल.
घरातील सॉकेटमध्ये चार्जर लावल्यावर 5 वोल्टची पॉवर जनरेट करतो. तर हा वॉकी मोबाईल चार्जर 6वोल्टची पॉवर तयार करतो. सलग तीनवेळा अपयशी झाल्यानंतरही या मुलांनी जिद्द न सोडता, तीन महिने कसून प्रयत्न करत आपला शोध यशस्वी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.