tax hike

Property tax hike postponed PT37S

Video| मुंबईकरांना दिलासा! मालमत्ता करातील वाढ एक वर्ष पुढे ढकलली

Property tax hike postponed
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी... मालमत्ता करातील वाढ आणखी एक वर्ष पुढे ढकललीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात मुंबईकरांना मोठा दिलासा दिलाय. कोरोना काळात मालमत्ता करातील पंचवार्षिक वाढ रोखली होती. याबाबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना सूचना दिल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं. यावेळी त्यांनी आशिष शेलारांसह अनेक आमदारांनी भेट घेऊन मागणी केल्याचंही सांगितलं.

Aug 26, 2022, 09:10 AM IST

जेटलींच्या अर्थसंकल्पात श्रीमंत आणि अतिश्रीमंतांना धक्का

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प सादर करत असताना व्यक्तीगत आणि कंपन्यांची आयकर मर्यादा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलंय. पण, श्रीमंत अती-श्रीमंतांना मात्र सरचार्जच्या रुपानं अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. 

Feb 28, 2015, 05:03 PM IST

नाशिककरांवर ३०% करवाढीचा बोजा!

नाशिक महापालिकेने नवनिर्माण करत घरपट्टीत दहा टक्के तर पाणीपट्टीत आठ टक्के असे तब्बल १८ टक्के दरवाढीचा दणका देणारे अंदाजपत्रक सादर केले आहे. यात मलनिस्सारण कर, वृक्ष कर तसच इतर करांमध्ये दुपटीने वाढ प्रस्तावित असल्याने ही करवाढ प्रत्यक्षात 30 टक्क्यापर्यंत होऊ शकते.

Feb 19, 2013, 06:20 PM IST