theft

नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ: ज्वेलरीच्या दुकानातून 17 लाख लंपास

नागपूरातील अतिशय व्यस्त असलेल्या इतवारी भागातील एका इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 17 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी उघड झाली. 

Jun 17, 2015, 04:51 PM IST

सीसीटीव्ही: चोरट्यांनी केली चंदनाची चोरी, कालिका मंदिरातील प्रकार

नाशिक शहरातील चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसून चोरट्यांनी आता मंदिरांनाही लक्ष करायला सुरवात केलीय. मुंबईनाका परिसरातील कालिकामाता मंदिराच्या आवारातील चंदनाच्या झाडाची पहाटे साडेपाच वाजता चोरी केलीय. 

Jun 3, 2015, 12:00 PM IST

मोबाईची चोरी झाली आणि...आयडियाची कल्पना!

मोबाईल फोन चोरी झाल्यानंतर आपण काय करतो..? पोलीस तक्रार नोंदवतो आणि फोन परत मिळण्याची वाट बघत बसतो. किंवा नवा फोन घेऊन मोकळे होतो. पण बदलापूरच्या एका तरूणानं मात्र आयडियाची कल्पना लढवली आणि मोबाईल चोराला रंगेहाथ पकडले.

May 28, 2015, 12:16 PM IST

मार नाही केळी खा, पण गिळलेलं मंगळसूत्र दे

अॅन्टॉप हिल येथे एका मंगळसूत्र चोराला नागरिकांनी पकडलं, पण चोराने अख्ख मंगळसूत्र गिळून टाकलं. मग चोराला रूग्णालयात नेण्यात आलं, तेथे त्याच्या पोटाचा एक्स रे काढण्यात आला. तेव्हा चोराला मार न देता पोलिसांनी केळी खायला दिलीय, यामुळे नैसर्गिक पद्धतीने हे मंगळसूत्र पोलिसांना हस्तगत करता येणार आहे.

Apr 29, 2015, 07:33 PM IST

चोरांचा मंदिराच्या दानपेटीवर डल्ला, नागपुरात हे चाललंय काय?

 राज्याची क्राइम कॅपिटल अशी नवी ओळख तयार झालेल्या नागपुरात, गुन्हेगारांनी नुसता उच्छाद मांडला आहे. चोरांनी जितक्या सहजतेनं सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, यांच्यासह VIPच्या नातेवाईकांना आपलं टार्गेट बनवलंय. तितक्याच सफाईनं चोरट्यांनी मंदिराच्या तिजोरीवरही डल्ला मारलाय. 

Apr 18, 2015, 09:11 PM IST

गजबजलेल्या परिसरात घरात घुसून वृद्ध महिलेला लुटले

नागपूरचे नवे पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव हे पदभार सांभाळत असतानाच, नागपुरातील गुन्हेगारांनी त्यांना जोरदार सलामी दिली. नागपुरातल्या चोरांची एवढी हिंमत वाढलीय की आता भरदिवसा घरात घुसून ते लुटालूट करू लागलेत. 

Apr 17, 2015, 10:05 PM IST

नागपूरमध्ये गडकरींच्या मेहुणांच्या घरी चोरी, 22 लाखांचा ऐवज लंपास

महाराष्ट्राची क्राइम कॅपिटल बनलेल्या नागपुरात चोरांचा अक्षरशः धुमाकूळ सुरूय... केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे मेहुणे किशोर तोतडे यांच्या घरी आता चोरी झालीय. 

Apr 17, 2015, 09:57 PM IST

ज्वेलरी शॉप्स लुटणारी महिला सीसीटीव्हीत कैद

ठाणे : ठाणे शहरात एका सराईत महिला ज्वेलरीथीपचा पर्दाफाश झाला आहे. काशिमिरा भागातील ही महिला सराईत चोरीकरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

रिना रामसिंग असं या महिलेचं नाव आहे. ही महिला डोळ्यांना चष्मा, स्कार्प लावून दुकानामध्ये प्रवेश करते, त्यानंतर दुकानदाराकडे अंगठी मागते दुकानदार अंगठी दाखवायला लागला की, त्याची नजरचुकवून आपले काम साथते.

Apr 10, 2015, 03:46 PM IST

चॉकलेट खाणं जीवावर बेतलं असतं पण...

चॉकलेट खायला कोणाला आवडणार नाही.?पण हेच चॉकलेट तुमच्या जीवावर बेतलं तर... असं घडलंय इंदापुरात पाहूयात...

Apr 8, 2015, 01:33 PM IST

पुण्यातही सोनसाखळी चोरांचा जोर वाढला

पुण्यातही सोनसाखळी चोरांचा जोर वाढला

Apr 1, 2015, 12:07 PM IST