नागपूर: राज्याची क्राइम कॅपिटल अशी नवी ओळख तयार झालेल्या नागपुरात, गुन्हेगारांनी नुसता उच्छाद मांडला आहे. चोरांनी जितक्या सहजतेनं सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, यांच्यासह VIPच्या नातेवाईकांना आपलं टार्गेट बनवलंय. तितक्याच सफाईनं चोरट्यांनी मंदिराच्या तिजोरीवरही डल्ला मारलाय.
नागपूरमधल्या सावरकर नगर भागातल्या मंदिरातच चोरांनी हात साफ केले. मध्यरात्रीनंतर ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरट्यांनी दानपेटी फोडून रक्कम लांबवली.
घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी मंदिरात दाखल झाले. त्यांनी तपासकार्य सुरु केलंय.
मंदिराचा दानपेटीतून सुमारे १,००० रुपये चोरीला गेलेत. पण या घटनेनंतर प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या शहरातच, आता सर्वसामान्य नागरिक तर सोडाच, पण मंदिरातले देवही सुरक्षित नाहीत का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.